गेले 15 दिवस दीपवीरनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. बंगळुरूला रिसेप्शन झालं. आज ( 28 नोव्हेंबर )ला मुंबईतलं पहिलं रिसेप्शन होतंय.
मुंबईत दोन रिसेप्शन्स होणार आहेत. आजच्या नंतर 1 डिसेंबरलाही दुसरं रिसेप्शन आहे. आजचं ( 28 नोव्हेंबर ) रिसेप्शन ग्रँड हयात इथे होतंय.
बंगळुरू इथल्या रिसेप्शनला स्पोर्ट्स, बिझनेस आणि टाॅलिवूड इथल्या हस्ती उपस्थित होत्या. आजच्या रिसेप्शनला फक्त दीपवीरची जवळची माणसं असतील.
आज ( 28नोव्हेंबर ) आणि 1 डिसेंबरचं रिसेप्शन गँड हयात इथे होणार आहे. आमंत्रण पत्रिकाही अगदी साधी आहे. पांढरी आणि गोल्डन रंगाची थिम ठेवलीय.
1 डिसेंबरची आमंत्रण पत्रिका लाल रंगाची आहे. मनीषा कोईरालानं आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर शेअर केलीय.
रिसेप्शन रात्री 8 वाजता सुरू होईल. दीपवीरचे इतके सुंदर फोटोज पाहिल्यावर रिसेप्शनला ते काय पहराव करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.