दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर आता सगळ्यांचं लक्ष प्रियांका-निकच्या लग्नाकडे लागलंय. जोधपूरला पारंपरिक पद्धतीनं हे लग्न होणार आहे. लग्नाचे सगळे विधी साग्रसंगीत होतील. संगीत सोहळ्यासाठी खास जागा निवडली गेलीय.
राजस्थानच्या मेहरानगढ किल्ल्यात प्रियांकाचा संगीत सोहळा रंगणार आहे. हा किल्ला राजस्थानमधला सर्वात मोठा किल्ला मानला जातो. 1460मध्ये राव जोधानं हा किल्ला बांधला होता. किल्ल्यावर मोठी तोफही ठेवलीय.
मेहरानगढचे तीन भाग आहेत. तिथे अनेक थोरामोठ्यांची लग्न होता. बाॅलिवूडची बरीच शूटिंग्ज इथे झालीयत.
काही दिवसांपूर्वी प्रियांका-निक हा किल्ला बघायला पोचले होते. त्यावेळचा फोटो व्हायरल झाला होता.
प्रियांकाची आई मधू चोप्राला आपल्या लेकीचं लग्न पारंपरिक पद्धतीनं करायचंय. म्हणूनच लग्नासाठी राजस्थान निवडलं. हाॅलिवूड अभिनेत्री लिज हर्लेनंही 2007मध्ये या किल्ल्यावर लग्न केलं होतं.