इटलीला दीपिकाचं लग्न लागलं. पण तिचा एक्स बाॅयफ्रेंड रणबीर कपूर काय करतोय हा तमाम फॅन्सना पडलेला प्रश्न. ते आम्ही शोधून काढलं.
रणबीर आणि आलिया सध्या ब्रह्मास्त्रचं शूटिंग करतायत. तेही दाऊदचा इलाका म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डोंगरी भागात.
या फोटोत रणबीर आणि आलिया दिसतायत. रणबीर फोनमध्ये गढून गेलाय तर आलियाच्या चेहऱ्यावर राग दिसतोय.कदाचित दोघांमध्ये वाद झाला असावा.
ब्रम्हास्त्र सिनेमा एक रोमँटिक कथा आहे आणि त्याला सुपरनॅचरल शक्तीची जोड आहे. रणबीर आणि आलिया यांचा रोमान्स सिनेमात पहायला मिळणार आहेच. पण त्याशिवाय अमिताभ बच्चन यांची हटके भूमिका या सिनेमात असेल.
काही महिन्यांपूर्वी बल्गेरियात ब्रह्मास्त्रचं शूटिंग झालं. तिथे असलेल्या धुंद वातावरणात सेटवरील कुणीतरी इथं मस्त गरमागरम समोसे आणि वडापाव खायला मिळाला तर काय मज्जा येईल अशी इच्छा व्यक्त केली. बिग बींनी लगोलग ही इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी कूकला सांगून संपूर्ण क्रूसाठी गरमागरम वडापाव आणि सामोसे बनवायला सांगितले.