बाॅलिवूडचा चार्मिंग वर रणवीर सिंग आणि सौंदर्यवती दीपिका पदुकोण यांचं लग्न जवळ येऊन ठेपलंय. दोघांसाठी हा क्षण खूप आठवणीतला होणार आहे. पण त्यांच्या वऱ्हाडींसाठीही हे लग्नही खूप आठवणीतलं ठरेल.
या लग्न सोहळ्यात जेवणात जी पक्वान्न ठेवली जाणार आहेत, ती खासच असणार आहेत. जेवणात काय पदार्थ ठेवले जातील याची माहिती आम्हाला मिळालीय.
या लग्नात इटालीयन आणि काॅन्टिनेंटल पदार्थ असतील. शिवाय पंजाबी आणि साऊथ इंडियन पदार्थही असतील.
शिवाय लग्नासाठी मिठाई आणि वेडिंग केक बनवण्याची जबाबदारी स्वित्झर्लंडच्या शेफवर दिलीय. त्यामुळे वेगळ्या चवीचे पदार्थ लग्नात खायला मिळतील.
दीपिका साऊथ इंडियन आणि रणवीर सिंधी. दोघांच्या पद्धतीनं लग्न होणार आहे. 14 नोव्हेंबरला दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न होईल, तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं लग्न होणार आहे. त्याआधी 13 नोव्हेंबरला संगीत आहे. इटलीच्या लेक कोमोत लग्नाचा हा सोहळा रंगणार आहे.