ती आली, तिनं पाहिलं आणि प्रेक्षकांना जिंकलंही. ईशा केसकर नवी शनाया म्हणून आली, तेव्हा जुन्या शनायाची जागा ती कशी घेणार याची चिंता होती. पण आता सगळंच बदललं. ईशाला तीच लोकप्रियता मिळतेय. त्याचाच आनंद आज तिच्या वाढदिवशी आहे.
ईशाला दिवाळीत शूटिंगपासून सुट्टी मिळाली होती. दिवाळी आणि वाढदिवस जोडून आल्यानं ईशाचं मोठं सेलिब्रेशन आहे.
ईशा तिचे घरचे, मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत वाढदिवस जोरदार साजरा करतेय.घरच्यांकडून ती लाड करून घेणार, फ्रेंड्ससोबत तिचे पार्टीचे प्लॅन्सही तयार आहेत. अगोदर बानू आणि आता शनाया, ईशाच्या या दोन्ही व्यक्तिरेखा कमालीच्या लोकप्रिय झाल्या.
बानू आणि शनाया खूप वेगळ्या आहेत. ईशा सांगते, ' बानू नि:स्वार्थी आहे, तर शनाया स्वार्थी आहे. ' शनायाचे काही शब्द म्हणजे गुड फाॅर नथिंग, ओल्ड फर्निचर, आॅरेज उच्चारताना ईशाला गंमत वाटतेय.
शनायाची भूमिका स्वीकारल्यावर बोलताना ईशानं नव्या शूजचं उदाहरण दिलं. ती म्हणाली, ' नवे शूज पायात फिट बसेपर्यंत चावतात, चपला आवाज करतात. पण थोडा संयम ठेवला तर ते फिट बसतात.
ईशा स्वत: कशी आहे ? 'मी कुठलीही परिस्थिती लगेच स्वीकारते.' ईशा सांगतेय. ' माझ्यात निरीक्षण शक्ती आहे. मी माणसांचं निरीक्षण करते. खरं कोण, परकं कोण हे मला लगेच कळते.'
शनायाच्या व्यक्तिरेखेसाठी मला स्वत:ला मेनटेन ठेवावं लागणार आहे, कारण ही शनाया आधुनिक आहे, ईशा सांगते.ईशा म्हणजेच शनायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.