रणवीर सिंग-दीपिकाचं लग्न जवळ येऊन ठेपलंय. त्याआधी रणवीरच्या घरी हळदीचा समारंभ सुरू झालाय.
हळदीचे पहिले फोटो शेअर झालेत. इटलीला निघण्याआधी अनेक लग्नाच्या रिती पूर्ण केल्या जातील.
दीपिका-रणवीरच्या लग्नाची तारीख नक्की झाली तशी फॅन्स त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवायला लागलंय. त्यांचं शाॅपिंग, लग्नाचे ड्रेस, लग्नाचं ठिकाण, मेन्यू वगैरे.
दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे ठिकाण निश्चित झाले असून ते दोघे इटलीमध्ये लग्न करणार आहेत. पण त्यानंतर ते हनिमूनला कुठे जाणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय.
ते हनिमूनला जातील, पण जास्त दिवस नाही. याचं कारण रणवीर सिंगच आहे. रणवीरमुळेच हनिमूनसाठी जास्त दिवस देता येणार नाहीत.
अर्थात त्याला फक्त रणवीर जबाबदार नाही. तर मुख्य व्यक्ती आहे रोहित शेट्टी. त्याच्यामुळेच दीपिका-रणवीरला हनिमून आटोपता घ्यावा लागणार आहे.
रणवीरचा बहुचर्चित सिंबा 28 डिसेंबरला रिलीज होतोय. रणवीरला सिनेमाच्या प्रमोशनसाठी बराच वेळ द्यावा लागणार. लग्न झाल्यावर त्याला याकडेच वळावं लागेल. सोनम कपूरच्या लग्नानंतरही असंच झालं होतं. तिलाही वीरे दी वेडिंगच्या प्रमोशनकडे वळावं लागलं होतं.