सध्या ब़ॉलिवूडमध्ये लग्नाचा सीझन सुरू आहे. नुकतंच दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली. त्याचबरोबर प्रियांका आणि निकने साखरपुडाही केला. या सगळ्यात आता अजून एका अभिनेत्रीच्या एंगेजमेंटची बातमी आली आहे.
ही अभिनेत्री ब़ॉलिवूडची नाही तर टीव्ही जगातली असून तिचं नाव आहे अादिती गुप्ता.
अादितीने छोट्या पडद्यावर अनेक मालिकांमध्ये काम केलंय. पण स्टार प्लसवरच्या ‘इश्कबाज’ या तिच्या मालिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.
अादितीचा होणारा नवरा हा चित्रपट किंवा टीव्ही जगातला नाही.
त्याचं नाव आहे कबीर चोप्रा.
अादितीने तिच्या साखरपुड्याची माहिती स्वतःच सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे.