• 22 ऑगस्ट : पोस्ट ऑफिस या महिन्यात आपली बँक लाँच करणार आहे. पोस्ट ऑफिस बँकिंग सेवेसोबतच जीवन विमासुद्धा देते.
  • पोस्ट ऑफिसच्या Postal Life Insurance या योजनेअंतर्गत आता तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचा जीवन विमा मिळू शकेल. जाणून घेऊयात पोस्ट ऑफिस लाइफ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल
  • Convertible Whole Life Insurance (सुविधा) Postal Life Insurance ही आपल्या भविष्यासाठीची एक सुविधा आहे.
  • ही सुविधा Endowment Assurance सारखी आहे.
  • 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही पॉलिसी Endowment Assuranceमध्ये ट्रान्सफर केली जाते. यात तुम्ही 5 वर्षानंतर लमसम पैसे भरू शकता.
  • यात महत्त्वाचं म्हणजे विमाकर्त्याचे वय हे 55 वर्षांपेक्षा अधिक असू नये.
  • विमाकर्त्याद्वारे जर 6 वर्षात पॉलिसीत बदल किंवा देवाणघेवाण झाली नाही तर ती पॉलिसी Whole Life Assurance समजली जाईल.
  • या प्लॅनमध्ये कर्ज सुविधा देखील उपलब्ध आहे आणि तीन वर्षानंतर तुम्ही पॉलिसी सरेंडरही करू शकता.
  • जर पॉलिसीवर पाच वर्षांआधी कर्ज घेतले किंवा पॉलिसी सरेंडर केली गेली असेल तर विमाकर्ता बोनससाठी पात्र राहणार नाही.
  • Anticipated Endowment Assurance (Sumangal): Postal Life Insuranceच्या या प्लानला सुमंगल या नावाने ओळखलं जातं.
  • ही योजना 5 लाख रुपयांच्या कमाल विम्याच्या रकमेसह पैसे परत पॉलिसी आहे.
  • ज्या लोकांना वेळोवेळी पैसे परत घेण्याची आवश्यकता असते त्या लोकांसाठी ही उत्तम पॉलिसी आहे. या सुविधेअंतर्गत वेळोवेळी विमाकर्त्याला Survival Benefits मिळतात.
  • Postal Life Insurance च्या या प्लानअंतर्गत दोन पॉलिसी उपलब्ध आहे. एक 15 वर्षांची आणि दुसरी 20 वर्षांची.
  • 15 वर्षांची पॉलिसी घेतल्यानंतर, विमा कंपनी विमाकर्त्याला 6 वर्षानंतर 20%, 9 वर्षानंतर पुन्हा 20%, 12 वर्षांनी पुन्हा 20% आणि 15 वर्ष पूर्ण झाल्यावर 40% अर्जित बोनस देईल.
  • तर 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 8 वर्षानंतर 20%, 12 वर्षानंतर 20%, 16 वर्षानंतर पुन्हा 20% आणि 20 वर्ष झाल्यानंतर 40% अर्जित बोनस देईल
Skip the ad in seconds
SKIP AD