• इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचा मोठा मुलगा राजीव गांधी यांच जन्म २० ऑगस्ट १९४४ मध्ये मुंबई येथे झाला. राजीव गांधी यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान होते.
  • राजीव यांचे सुरूवातीचे शिक्षण देहरादूनच्या प्रसिद्ध दून शाळेत झले. राजीव यांनी १९६५ मध्ये ब्रिटनच्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या इम्पेरियल कॉलेजमधून इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले.
  • लंडनमध्ये त्यांची ओळख सोनिया यांच्याशी झाली. दोघांनी १९६८ मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न केले.
  • सोनिया आणि राजीव यांना राहुल आणि प्रियांका ही दोन मुलं आहेत.
  • भारतात परतल्यानंतर राजीव यांनी कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळवले. १९६८ मध्ये पायलट म्हणून ते नोकरी करत होते
  • छोटा भाऊ संजय गांधी यांची २३ जून १९८० मध्ये एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. संजय यांच्या मृत्यूनंतर राजीव यांनी आई इंदिरा गांधी यांच्या मदतीसाठी राजकारणात पाऊल ठेवले.
  • राजीव गांधी जून १९८१ मध्ये अमेठी लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आले. या यशामुळे त्यांच्यासाठी संसदेची दारं उघडली गेली.
  • ३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्याच दिवशी ४० वर्षीय राजीव यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
  • काँग्रेसने ५०८ मतांपैकी रेकॉर्ड ब्रेक ४०१ बिनशर्त मतं मिळवली.
  • १९८९ मध्ये बोफोर्स घोटाळ्यामुळे काँग्रेस सत्तेपासून दूर झाली.
  • २१ मे १९९१ मध्ये निवडणुकांच्या सभांसाठी राजीव गांधी तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुर येथे गेले असता, एका आत्मघाती हल्ल्यात राजीव यांची हत्त्या करण्यात आली.
  • राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
Skip the ad in seconds
SKIP AD