अमिताभ बच्चन यांना घरचं जेवण पसंत आहे. बाहेरचे पदार्थ खाणं टाळण्यासाठी सेटवर जाताना ते घरचं डबा घेऊन जातात.
विशेषत: अमिताभजी हे व्हेजिटेरीयन आहेत. तसेच सतत त्यांच्या जेवणात भेंड्याची भाजी, पोळी आणि वरण असतं. भेंड्याची भाजी हि अमिताभजींच्या आवडीची आहे असंही म्हणलं जातं.
अमिताभजी यांनी गोड पदार्थ खाणं देखील बंद केले आहे. सध्या ते आहारात साखर ऐवजी मधाचा वापर करतात. तसेच चहा किंवा कॉफी ते पीत नाही. त्यांना गरम पाणी आणि लिंबू सरबत प्यायला आवडतं.
शराबी असल्याचा अभिनय करणारे अमिताभ बच्चन हे दारूचं व्यसन करत नाही. त्यांच्या पेय पदार्थांमध्ये अल्कॉहॉल असलेल्या पदार्थांचा उल्लेख नसतो. तसेच ते सिगारेट तंबाखूच्या पदार्थांचे सेवन करत नाही.
दिवस-रात्र शूटींगमध्ये व्यस्थ असूनही व्यायामासाठी मात्र ते रोज सकाळी 6 वाजता तयार असतात. गेल्या 10 वर्षांपासून ते व्यायामाला महत्व देत आहेत. सध्या त्यांच्या वाढत्या वयाबरोबर योग्य व्यायाम करणं शक्य होत नाही, पण ते रोज प्राणायम करतात.