गणेश गायकवाड, प्रतिनिधी, अंबरनाथ: आपली मेहनत आणि हुशारी आयुष्यात कधी रंग भरेल याचं काही सांगता येत नाही. तसंच काहीसं अंबरनाथ महानगर पालिकेच्या सफाई कामगार मनीष पाटील यांच्यासोबत झालं आहे.
हा सफाई कामगार थेट कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जाऊन पोहचला आहे. मनीष पाटील असं या कामगारांचं नाव असून वाचनाची आवड, सतत काही तरी शोधण्याची वृत्ती यामुळे त्यांनी कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
सध्या सगळ्यात प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सुपरस्टार अमिताभ बच्चन समोर अनेक प्रश्नांची उत्तरं देत या पठ्याने सगळ्यांची मन तर जिंकली पण एक वेगळाच आदर्श सगळ्यांसमोर घालून दिला आहे.
एका-एका प्रश्नाची उत्तर देत मनीष यांनी तब्बल 12 लाख रुपये जिंकले आहेत. पाटील हे अंबरनाथ पालिकेत सफाई कामगार आहेत. केबीसीमध्ये जाऊन आल्यानंतर ही खाकी गणवेश, पायात चप्पल घालून रोज सकाळी साडेसहा वाजता आपल्या कामावर हजर होतात.
सफाई कामगार असल्यानं गटारं, नाले आणि रस्ते साफ करण्याचे ते आजही काम करतात. पाटील यांनी जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर सोनी टीव्हीवरील कौन बानेगा करोडपती या कार्यक्रमात थेट अमिताभ बच्चन यांच्या समोर प्रश्न मंजुशेच्या खेळ खेळाला.
३१मार्च १९९७ साली मनीष हे अंबरनाथ पालिकेच्या सेवेत सफाई कामगार म्हणून रुजू झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केलं. मात्र वाचनाची आवड असल्यानं सतत काही तरी वाचण्यात त्यांना आनंद मिळत होता.
सफाई कामगार म्हणून सकाळी साडेसहा ते दुपारी अडीच या वेळेत काम पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात टीव्ही पाहणं, वाचन करणं, मोबाईलवर वेगवेगळी माहिती शोधणं हे ते करायचे. त्यांच्या या शोधक बुद्धीनेच त्यांना कौन बनेगा करोडपतीची दार खुलं करून सुपरस्टार अमिताभ बच्चन समोर हॉट सीटपर्यंत नेलं. इथं पोहचण्यासाठी कामातील सहकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी खूप मदत केल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
नुकतीच या कार्यक्रमाची शुटिंग पार पडली. मात्र यातील जिंकलेली सर्व रक्कम ते आपल्या मुलासाठी वापरणार आहेत. या कार्यक्रमात आपण पोहचू हे मला तर शक्य वाटत नव्हतं मात्र पत्नी आणि मुलांना विश्वास होता असं पाटील यांनी सांगितलंय.
हा कार्यक्रम प्रसारित झाल्यावर पाटील यांचा फोन सतत खणखणत होता. सहकाऱ्यांनीदेखील कामाच्या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. दरम्यान या कार्यक्रमामुळे आमचं आयुष्य बदललं असून सध्या सगळीकडे मान मिळत असल्यानं पतीचा अभिमान वाटत असल्याची भावना पाटील यांच्या पत्नीनं व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडीला मनीष पाटील हे अंबरनाथ शहरासाठी सेलिब्रेटी आहेत. मात्र असं असलं तरी त्यांचे पाय आजही जनिमीवर याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आणि न्यूज18 लोकमतच्याही त्यांना खूप-खूप शुभेच्छा.