'ठग्ज आॅफ हिंदोस्तान' सिनेमाची उत्सुकता खूप आहे. सिनेमातल्या एक एक ठग्जची लूक्स समोर येतायत.
अगदी सुरुवातीला बिग बींचं लूक समोर आलं. तर आता आमिर खानचं लूक पुढे आणलंय.
आमिरनं आपलं लूक सोशल मीडियावर शेअर केलंय. त्यावर त्यानं लिहिलंय, इ हैं हम, फिरंगी मल्लाह. हम से ज्यादा नेक इंसान इस धरती पे कहीं नहीं मिलेगा आपको. सच्चाई तो हमरा दूसरा नाम है, और भरोसा हमरा काम. दादी कसम
गेल्या आठवड्यात कतरिनाचा लूक लाँच केला. कॅट या सिनेमात सुरैया बनलीय. तिच्या अदा अनेकांना घायाळ करणार असं दिसतंय.
त्याआधी व्हिलनची एन्ट्री झालीय. तो आहे ईस्ट इंडिया कंपनीचा कमांडर जाॅन क्लिव. ती भूमिका साकारलीय लाॅईड ओव्हननं.
फातिमा सना शेखचा लूकही समोर आलाय. धनुष्य बाण घेऊन आहे ती जाफिरा.