दीपिका कक्कड - प्रत्येक पर्वात जसे अनेक टीव्ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात. या पर्वात दीपिका कक्कडची वर्णी लागलीय. दीपिका कलर्स चॅनेलवरच्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकत झळकली होती. नुकतेच त्याने आपला सह-कलाकार शोएब इब्राहिमशी लग्न केलं.
नेहा पेंडसे – नेहाने यावर्षी बिग बॉसमध्ये एंट्री केलीय. तिनं 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत काम केलंय. या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. नेहाच्या एंट्रीमुळे असं बोललं जातंय की ती दीपिकाला टक्कर देऊ शकते.
सृष्टी रोडे - सृष्टी रोडेने देखील अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. ती बिग बॉसच्या घरात आता काय कमाल दाखवते ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
रोशमी बनिक – रोशमीने एक सामान्य महिला म्हणून बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. आत्तापर्यंत टीव्ही कलाकारांसोबत सामान्य नागरिकसुद्धा बिग बॉसमुळे प्रसिद्ध झालेत. रोशमी काय जलवा दाखवते ते लवकरच कळेल.
कीर्ती वर्मा – कीर्तीसाठी रिआलिटी शोमध्ये भाग घेणं काही नवीन गोष्ट नाहीय. ती रोडिजमधल्या एका पर्वाची स्पर्धक होती.