पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज चढताहेत. या वेगाने हे दर आभाळाला टेकतील असं वाटतंय. इंधनाची किंमत वेगाने वाढते आहे, आणि आपली इंधनाची गरजही. गाडी न वापरता आपण जगू शकू का आता?
जगात असेही काही देश आहेत जिथं पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी पारंपरिक इंधनाचा वापर करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशा ५ देशांची नाव सांगणार आहोत जिथं लोक पेट्रोल- डिझेलचा वापर करत नाहीत.
कोस्टा रिका – २०१५पासूनच कोस्टा रिका हा देश १०० टक्के ग्रीन झालाय. म्हणजे पर्यावरणपूरक बदल त्यांनी रोजच्या जगण्यात केलेत. या व्यापक बदलांमुळे या देशातील लोकांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालंय. या देशात अपारंपरिक उर्जा साधनांचाच वापर होतो. त्यात मोठा वाटा जलविद्युतचा आहे. हायड्रोइलेक्ट्रिसिटीबरोबर बायोगॅस आणि सौर ऊर्जेवर ते आपले सगळे उद्योग चालवतात.
डेन्मार्क – हा देश १९७० पासून पवनचक्क्यांचा वापर करत आहे. यामुळे डेन्मार्क देशातील एकूण ४० टक्के लोक या स्वच्छ ऊर्जेचा आनंद घेत आहेत. २०२० पर्यंत हा आकडा ५० टक्के करण्याची त्यांची कल्पना आहे. त्याचबरोबर 2050 पर्यंत 100% अपारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.
स्वीडन – हा देशाने त्याचा शेजारी असलेला डेन्मार्कच्या पावलावर पाऊल टाकत कोळश्याचा कमीत कमी वापर करतो. त्याचबरोबर देश बायोमास ऊर्जा प्रणालींचा विकास देखील करत आहे. २०१० पासूनच स्वीडन जीवाश्म इंधनापेक्षा बायोमासमधून जास्त ऊर्जा प्राप्त केलीय.