शाहरुख खान जरी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असला तरी तो त्याच्या मुलांना आवर्जून वेळ देतो. शाहरुखचे मुलगी सुहानासोबत फिरतानाचे फोटो अनेकदा व्हायरल झालेत. त्यामध्ये अजून काही खास फोटोंची भर पडली आहे.
हा आहे शाहरुख आणि सुहाना खानचा मुंबई एअरपोर्टवरचा नवा लुक. कॅज्युअल लुकमध्ये शाहरुख आणि सुहाना फ्रेश दिसत होते.
या फोटोमध्ये शाहरुखची आपल्या मुलीसाठीची काळजी दिसून आली. मीडिया अटेंन्शन टाळण्याचा प्रयत्न त्याने केला नाही. पण मुलीला या पापाराझींपासून लवकरात लवकर दूर घेऊन जाण्याची त्याची लगबग जाणवली.
सुहानाने गेल्या महिन्यातच तिचं पहिलं फोटोशूट केलं होतं. व्होग या मॅगझिनसाठी तिने हे फोटो शूट केलं आहे. शाहरुखने स्वतः हे मॅगझिन लाँच केलं होतं.
सुहानानं गेल्या महिन्यात पहिल्यांदाच एका फॅशन मॅगझीनसाठी फोटो शूट केलं. नंतर तिच्यावर मीडियाची नजर आता आणखी रोखली गेलेली आहे हे निश्चित.
शाहरूखची लाडली सुहाना सध्या जाम चर्चेत असते. ती व्होग मासिकाच्या कव्हरपेजवर आली आणि मीडियाची नजर तिच्यावर खिळून राहिली.
सुहाना खान काही दिवसांपूर्वी इटलीत होती. तिनं आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर धमाल केली तिथे.
इन्स्ट्राग्रामवर तिनं काही फोटो टाकलेत.
सुहाना खान शाळा-कॉलेजमध्ये नाटकात सहभागी होत असे आणि तिला सिनेमा खूप आवडतो.
पित्याच्या पावलावर पाऊल टाकत तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तर आश्चर्य वाटायला नको. व्होगचं हे कव्हरपेज याचीच पाऊलखूण तर नाही ना?