मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

तिच्या सौंदर्याला भुलाल तर तुम्ही फसाल, कारनामे ऐकून सरकेल पायाखालची जमीन

तिच्या सौंदर्याला भुलाल तर तुम्ही फसाल, कारनामे ऐकून सरकेल पायाखालची जमीन

22 वर्षीय नामराचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

22 वर्षीय नामराचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

22 वर्षीय नामराचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: दिल्लीतली प्रसिद्ध यूट्यूबर नामरा कादिर हिचं नाव सध्या चर्चेत आहे. तिला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. एका खासगी कंपनीच्या मालकाकडून 80 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याप्रकरणी आणि बनावट बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नामराला दिल्लीतून अटक करण्यात आली असून, तिला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. 'झी न्यूज हिंदी'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

नामराने एका 21 वर्षीय व्यावसायिकासोबत लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. पीडित व्यावसायिकाने चार महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, तेव्हा नामराने अंतरिम जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती; पण कोर्टाने तिचा अर्ज फेटाळला होता.

22 वर्षीय नामराचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. लोकांना तिच्या अटकेबद्दल कळताच ती असं करू शकते, यावर अनेकांना विश्वास बसला नाही.

नामराने पतीसह मिळून गुरुग्राममधल्या एका बिझनेसमनला फसवलं आणि नंतर त्याला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन तब्बल 78 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळली.

पती-पत्नीचे एकमेकांवर जुगारी असल्याचे आरोप, पोलीसही चक्रावले

गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यूट्यूबरने बिझनसमनशी संबंध ठेवतानाचे काही फोटो काढले होते. काही दिवसांनी तिने त्याला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली.

80 लाख रुपये देऊनही तिने आणखी पैसे मागितल्याने 24 नोव्हेंबर रोजी संतप्त बिझनसमनने सेक्टर 50 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. यानंतर पोलिसांनी नामरा कादिरला अटक केली. बादशाहपूरचा रहिवासी दिनेश यादवने (21) ऑगस्टमध्ये तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु तिने ताबडतोब अंतरिम जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती.

या बिझनसमनने तक्रारीत म्हटलंय, की 'कामानिमित्त सोहना रोडच्या रेडिसन हॉटेलमध्ये नामरा कादिर नावाच्या तरुणीशी भेट झाली होती. तिने सांगितलं होतं की ती YouTuber असून तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिचं यश आणि व्हिडिओ पाहून प्रभावित झाल्यावर तिने मैत्रीसाठी हात पुढे केला. तिने यूट्यूबर विराट बेनीवालशीही ओळख करून दिली.

ज्याच्यावर ठेवला विश्वास त्यानेच केला घात; गुंगीचं औषध देत दाम्पत्यासोबत नोकराने.. पुण्यातील घटना

त्या दोघांनी आपल्या फर्ममध्ये काम करण्याची ऑफर स्वीकारून दोन लाख रुपये अॅडव्हान्स मागितले. त्यानंतर मी ते दोन लाख दिले. नंतर तिने जाहिरातीच्या नावावर 50 हजार मागितले. ते पैसे दिल्यानंतर एके दिवशी तिने हॉटेलमध्ये जे घडलं होतं, त्यावरून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.' गुरुग्रामच्या सेक्टर-50 स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राजेश कुमार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, नामराने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने घेतलेले पैसे आणि इतर वस्तू परत करण्यासाठी पोलिसांनी तिला कोठडीत ठेवलंय. तसंच तिचा पती आणि सहआरोपी मनीष उर्फ विराट बेनीवाल याला लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. नामरा कादिरला अटक झाल्यानंतर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून कोणतीही पोस्ट करण्यात आलेली नाही.

First published: