मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पाकिस्तानी YouTuber ला तुरुंगवास, Mob Lynching चं केलं होतं समर्थन

पाकिस्तानी YouTuber ला तुरुंगवास, Mob Lynching चं केलं होतं समर्थन

Mob Lynching च्या घटनेचं समर्थन करणारा व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी एका यूट्यूबरला पाकिस्तानच्या न्यायालयानं 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Mob Lynching च्या घटनेचं समर्थन करणारा व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी एका यूट्यूबरला पाकिस्तानच्या न्यायालयानं 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Mob Lynching च्या घटनेचं समर्थन करणारा व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी एका यूट्यूबरला पाकिस्तानच्या न्यायालयानं 1 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

इस्लामाबाद, 23 जानेवारी: जमावाने केलेल्या हत्येचं (Mob Lynching) समर्थन (Support) करणारा व्हिडिओ (Video) तयार करून तो व्हायरल (Viral) करणाऱ्या एका तरुणाला पाकिस्तानच्या न्यायालयानं (Pakistan court) एक वर्षं तुरुंगवासाची शिक्षा (one year imprisonment) फर्मावली आहे. पाकिस्तानमध्ये जमावाकडून एका श्रीलंकन नागरिकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जगभरात पाकिस्तानची नाचक्की झाल्यानंतर या प्रकरणी पाकिस्तानमध्ये खटला उभा राहिला. मात्र तरीही अनेकजण उघडपणे तर अनेकजण छुप्या पद्धतीने या मॉब लिंचिंगचं समर्थनच करत असल्याचं दिसून आलं. त्यापैकी यूट्यूब चॅनेलवरून याचं समर्थन करणाऱ्या एकाला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी 3 डिसेंबर या दिवशी प्रियंथा कुमार या 47 वर्षीय श्रीलंकन नागरिकाचा खून केला होता. सुमारे 800 जणांचा समूह कुमार यांच्यावर धावून गेला होता. त्याचा खून करत मृतदेह पेटवून देण्यात आला होता. तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या संघटनेनं हे कृत्य केलं होतं. लाहोरपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती. या संवेदनशील घटनेचे केवळ पाकिस्तानच नव्हे तर जागतिक राजकारणात पडसाद उमटले होते.

यूट्यूबरने केलं समर्थन

अशा प्रकारे जमावाने एखाद्या परदेशी व्यक्तीला ठेचून मारण्याच्या कृत्याचं समर्थन करणारा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात व्हायरल होत होता. मोहम्मद अदनान नावाच्या व्यक्तीनं आपल्या यूट्यूब चॅनेलवरून हा व्हिडिओ प्रसारित केला होता. जमावानं केलेल्या कृत्याचं आणि खून करून शरीर पेटवून देण्याच्या घटनेचं उघडउघड समर्थन करण्यात आलं होतं.

हे वाचा- विक्रमवीर Sea Rower चा अखेर समुद्रातच मृत्यू, 75 व्या वर्षी घेतलं होतं Challenge

शिक्षा आणि दंड

अगोदरच पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होत असताना अशा प्रकारे यूट्यूबद्वारे होणारं समर्थन ही पाकिस्तानची डोकेदुुखी वाढवणारी गोष्ट ठरत होती. पाकिस्तानच्या न्यायालयानं या प्रकरणी आरोपी मोहम्मद अदनानला 1 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असून 10 हजार पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मॉब लिंचिंग प्रकरणात आतापर्यंत विविध सीसीटीव्ही फूटेजद्वारे 200 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र त्यापैकी 115 जणांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आलं आहे.

First published:

Tags: High Court, Pakisatan, Youtube