Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रेयसीला भेटण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, वडिलांकडे मागितली खंडणी आणि मग...

प्रेयसीला भेटण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, वडिलांकडे मागितली खंडणी आणि मग...

प्रेयसीला भेटायला (Youth planned fake kidnapping of himself to get money) जाण्यासाठी पैसे हवेत म्हणून एका तरुणानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला.

प्रेयसीला भेटायला (Youth planned fake kidnapping of himself to get money) जाण्यासाठी पैसे हवेत म्हणून एका तरुणानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला.

प्रेयसीला भेटायला (Youth planned fake kidnapping of himself to get money) जाण्यासाठी पैसे हवेत म्हणून एका तरुणानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला.

  • Published by:  desk news

भोपाळ, 10 नोव्हेंबर: प्रेयसीला भेटायला (Youth planned fake kidnapping of himself to get money) जाण्यासाठी पैसे हवेत म्हणून एका तरुणानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. घरातून गायब होत (Youth called his father for ransom) वडिलांना फोन केला आणि खंडणीची मागणी केली. मात्र वडिलांनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी केलेल्या (Police investigation reveals the truth) तपासात या तरुणानं स्वतःच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं स्पष्ट झालं.

प्रेयसीसाठी रचला डाव

मध्यप्रदेशातील भिंडमध्ये राहणाऱ्या आणि नुकतंच 18 वं वर्षं लागलेल्या एका तरुणाचं दिल्लीत राहणाऱ्या तरुणीवर प्रेम होतं. तिला भेटायला जाण्याची तरुणाची इच्छा होती. मात्र पैसे नसल्यामुळे त्याला दिल्लीला जाणं शक्य होत नव्हतं. आपल्याला दिल्लीला जाण्याची इच्छा असून त्यासाठी पैसे हवे असल्याची मागणीही त्यानं कुटुंबीयांकडं केली होती. मात्र त्याच्या मागणीला घरच्यांनी नकार दिला होता. त्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी पैसे कसे मिळवावेत, याचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता.

मोबाईल ऍपचा वापर

खंडणी मागून पैसे मिळवण्याची कल्पना या तरुणाला सुचली. त्यासाठी आवाज बदलून मोबाईल कॉल करण्याची सोय असलेल्या एका ऍपची या तरुणाने मदत घेतली. अगोदर तो घरातून गायब झाला आणि बाहेरून या ऍपच्या मदतीनं वडिलांना फोन केला. तुमच्या मुलाचं अपहरण झालं असून अडीच लाख रुपये खंडणीची मागणी त्याने केली. खंडणीची रक्कम पोहोचली नाही, तर मुलाचा खून करण्याची धमकीही त्यानं वडिलांना दिली. आवाज बदललेला असल्यामुळं आपलाच मुलगा आपल्याशी बोलतो आहे, हे वडिलांना समजलं नाही. मात्र मुलाच्या मोबाईल नंबरवरून फोन आल्याचं पाहून ते घाबरले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

हे वाचा- एका चुकीमुळे अडीच कोटींचं नुकसान; शेतकऱ्यांची 25 एकरावरील द्राक्षबाग झाली नष्ट

पोलिसांनी काढला माग

मुलगा घरातून गायब असल्याची तक्रार वडिलांनी पोलिसांत अगोदरच केली होती. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेतच होते. त्यातच मुलाच्या मोबाईलवरून खंडणीसाठी फोन आल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलाला शोधलं आणि ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं खरी माहिती दिली आणि मुलानंच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं उघड झालं.

कोवळ्या वयातील प्रेमप्रकरणाचा मामला असल्यामुळं पोलिसांनी ताकीद देऊन या मुलाला सोडून दिलं आहे.

First published:

Tags: Boyfriend, Crime, Girlfriend, Kidnapping, Police