• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • गुंडाराज! EX Girlfriend ला भेटायला बोलावून भर रस्त्यात खून, हल्ला करून आरोपी फरार

गुंडाराज! EX Girlfriend ला भेटायला बोलावून भर रस्त्यात खून, हल्ला करून आरोपी फरार

आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला बोलावून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना (Youth murders his ex-girlfriend by stabbing her) नुकतीच समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला बोलावून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना (Youth murders his ex-girlfriend by stabbing her) नुकतीच समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या अगोदरच्या (Called her to meet and killed her) गर्लफ्रेंडला भेटायला बाहेर बोलावलं. ती समोर येताच तिच्यावर चाकूचे वार करत तिचा बळी घेतला. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळं (Murder in public place) पाहणाऱ्यांचाही थरकाप उडाला. खुनी तरूण हा तरुणीचा शेजारीच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. असा केला खून ही खळबळजनक घटना घडली दिल्लीतील द्वारका जिल्ह्यात. या परिसरात राहणाऱ्या डॉली नावाच्या तरुणीचं अंकित गाबा नावाच्या तरुणासोबत काही महिन्यांपूर्वी अफेअर होतं. मात्र त्यानंतर त्यांच्यात भांडणं होऊन दोघांनी ब्रेकअप घेतला होता. या गोष्टीचा राग अंकितच्या मनात होता. त्यानं डॉलीला धडा शिकवायचं ठरवलं. एक दिवस काही महत्त्वाचं बोलायचं असल्याचं सांगून त्यानं डॉलीला बाहेर बोलावलं. अंकितसोबत त्याचे दोन मित्र हिमांशु आणि मनीष हेदेखील होते. तिघांनी मिळून डॉलीवर हल्ला केला आणि तिच्यावर चाकूचे सात वार केले. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या डॉलीला रस्त्यावरच टाकून हल्लेखोर फरार झाले. हॉस्पिटलमध्ये झाले मृत्यू हल्ल्यानंतर हॉस्पिटमध्ये नेलं असताना डॉलीला मृत घोषित करण्यात आलं. मात्र पोलिसांना ना या घटनेचा पीसीआर कॉल आला ना कुठली तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. डॉलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात शांत राहणंच पसंत केल्याचं दिसून आलं. मात्र दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाल्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. हे वाचा- दारुड्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी थेट आमदारांचा पुढाकार; म्हणे, दारू तर पिणारच! पोलीस घेतायत शोध पोलिसांनी आरोपी अंकित आणि त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू केला आहे. डॉलीचा खून केल्यानंतर तिघेही गायब असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे राजधानी दिल्लीत चांगलीच खळबळ उडाली आहे.
  Published by:desk news
  First published: