Home /News /crime /

जमिनीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन हत्या, आरोपींनी स्वत: रुग्णालयात केले दाखल

जमिनीच्या वादातून तरुणाला मारहाण करुन हत्या, आरोपींनी स्वत: रुग्णालयात केले दाखल

धुळे (Dhule) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जागेच्या वादातून एकाला मारहाण करण्यात आली. तसेच गळफास देऊन त्याचा खून (Murder in Dhule) करण्यात आला आहे. रावसाहेब काशीनाथ पाटील (वय 31, रा. दहिनेल, ता. साक्री) असे मृत तरुणाचे नाव आहे

पुढे वाचा ...
  धुळे, 18 मे : धुळे (Dhule) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. जागेच्या वादातून एकाला मारहाण करण्यात आली. तसेच गळफास देऊन त्याचा खून (Murder in Dhule) करण्यात आला आहे. रावसाहेब काशीनाथ पाटील (वय 31, रा. दहिवेल, ता. साक्री) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची मोठी बहिण सुलोचना सुदाम पाटील (37, रा. कोरवाडे, ता. साक्री, ह.मु. विक्रोळी, मुंबई) यांनी फिर्याद दिली. पूर्वीच्या रागातून ही हत्या -  जागेच्या वादातून डोक्यावर मारहाण करत गळफास देऊन तरुणाचा खून करण्यात आला होता. ही घटना साक्री तालुक्यातील दहिवेल शिवारात चार दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, सोमवारी सांयकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालावली. पूर्वीच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाण करुन रुग्णालयात केले दाखल -  मृत रावसाहेब काशीनाथ पाटील याची मोठी बहिण सुलोचना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पूर्वीच्या वादातून राग धरून रावसाहेब याला गावातील बांधकाम सुरू असलेल्या तळघरात हत्याराने त्याच्या डोक्याला मागील बाजूस मारहाण केली. तसेच गळफास देऊन गंभीर दुखापत झाली. दहिवेल येथील धनराज वंजा माळी आणि सचिन माळी या दोघांनी रावसाहेब याला मारहाण केली. हेही वाचा - आर्थर रोड जेलमध्ये महिला कैदीसोबत भयंकर कृत्य, वाचून तुम्हच्याही अंगावर येतील शहारे
  त्यानंतर त्यांच्यावर संशय येऊ नये, म्हणून रावसाहेब याला परस्पर दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविले गेले. सोमवारी सोमवारी सांयकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालावली. याप्रकरणी मृत रावसाहेब पाटील याच्या बहिणीच्या फिर्यादीनंतर दहिवेल येथील धनराज वंजा माळी आणि सचिन माळी या दोघांवर कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढीत तपास करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Dhule, Murder news

  पुढील बातम्या