• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • जिगरी दोस्तांनीच केला घात, निर्जन ठिकाणी बोलावून मित्राचा केला खून

जिगरी दोस्तांनीच केला घात, निर्जन ठिकाणी बोलावून मित्राचा केला खून

जवळच्या मित्रांनीच एका तरुणाला (Youth killed by his close friends in deserted place) निर्जन ठिकाणी बोलावून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 • Share this:
  जयपूर, 17 नोव्हेंबर: जवळच्या मित्रांनीच एका तरुणाला (Youth killed by his close friends in deserted place) निर्जन ठिकाणी बोलावून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांवर जराही संशय न आलेला हा तरुण बेसावध (Plan of murder of a friend) असताना तीन मित्रांनी त्याच्या हत्येचा डाव आखला आणि तो पूर्णत्वाला नेला. किरकोळ कारणावरून रागावलेल्या मित्रांनी तरुणाला लाठ्याकाठ्या आणि कुऱ्हाडीनं मारहाण करून त्याचा बळी घेतला. घरगुती कारणावरून वाद गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे जीवलग मित्र असणारे तिघे राजस्थानच्या बारमेर भागात राहत होते. वासन खान नावाच्या तरुणाची लियाकत आणि रमदान यांच्याशी घट्ट मैत्री होती. काही दिवसांपूर्वी वासनचे लियाकत आणि रमदान यांच्या कुटुंबीयांसोबत वाद झाले होते. घरगुती कारणावरून पेटलेल्या वादानं गंभीर वळण घेतलं होतं. त्यामुळे लियाकत आणि रमदान हे आपल्या मित्राचा राग मनात ठेऊन होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी मित्राचा जीव घेऊन कुटुंबीयांच्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि मित्राला निर्जन ठिकाणी बोलावलं. अंधारात केला खून रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी वासन आल्यानंतर मित्रांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. आपल्या मित्रांकडून होत असलेल्या मारहाणीमुळे त्याला धक्का बसला. मात्र प्रतिकार करण्याची कुठलीही संधी न देता मित्रांनी त्याच्यावर कुऱ्हाडीचे वार केले. घाव वर्मी झाल्यामुळे वासस गंभीर जखमी झाला. रात्रीच्या अंधारात वासनला तिथेच सोडून आरोपी मित्र पळून गेले. हे वाचा- Gold Price today : सोने-चांदीच्या दरात घसरण, चेक करा काय आहेत नवे दर? उपचारादरम्यान झाला मृत्यू गंभीर जखमी झालेल्या वासनला त्याचे कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वासनचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून त्याच्या दोन्ही मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोली या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: