मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आयुष्यभर सोबत राहायचं वचन दिलं पण लग्नानंतर 15 दिवसातच तरुणाने घेतला जगाचा निरोप, बुलडाण्यातील हृदयद्रावक घटना

आयुष्यभर सोबत राहायचं वचन दिलं पण लग्नानंतर 15 दिवसातच तरुणाने घेतला जगाचा निरोप, बुलडाण्यातील हृदयद्रावक घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विशेष बाब म्हणजे 15 दिवसा अगोदरच त्याचं लग्न झालं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India

राहुल खंदारे, बुलडाणा 31 मार्च : राज्यात गुन्हेगारी आणि आत्महत्येच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अनेकदा लोक नैराश्यातून किंवा सततच्या समस्यांना कंटाळून टोकाचं पाऊल उचलतात. मात्र हा घरातील इतर लोकांसाठी अतिशय मोठा धक्का असतो. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आहे. जिच्या पतीने लग्नानंतर अवघ्या 15 दिवसातच आत्महत्या करून आपला जीवनयात्रा संपवली. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील किसन नगर येथील आहे.

मृतदेहाशिवाय अंत्यसंस्कार, गावातून दररोज संध्याकाळी निघायची अंत्यसंस्कार, समोर आलं भयानक सत्य

एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिनल कमानी असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. विशेष बाब म्हणजे 15 दिवसा अगोदरच त्याचं लग्न झालं होतं. मात्र लग्नानंतर अवघ्या १५ दिवसातच त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हिनल कमानी हा युवक अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्या का केली? याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. सध्या याबाबतचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. यासोबतच आत्महत्येचं कारणही शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्यावरुन वाद; तरुणाने सहकाऱ्यासोबत केलं हादरवणारं कृत्य

आव्हाडांचे अंगरक्षक राहिलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या -

नुकतंच ठाण्यातूनही एक आत्महत्येची घटना समोर आली होती. यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अंगरक्षक राहिलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अनंत करमुसे प्रकरणी वैभव कदम यांची सतत चौकशी सुरू होती. त्यानंतर अचानक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघा-ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. वैभव कदम असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

First published:
top videos

    Tags: Marriage, Shocking news