Home /News /crime /

जांभळी तोडायला झाडावर चढला, मात्र, फांदी तुटल्याने तरुणाचा मृत्यू; जळगावमधील घटना

जांभळी तोडायला झाडावर चढला, मात्र, फांदी तुटल्याने तरुणाचा मृत्यू; जळगावमधील घटना

झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरात (Jalgaon City) घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 8 मे : झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. ही घटना जळगाव शहरात (Jalgaon City) घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सुकदेव सकट असे मृताचे नाव आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. काय आहे पूर्ण घटना? ज्ञानेश्वर सुकदेव सकट हा तरूण आपल्या आईवडील व दोन भावांसह राहत होता. तो टाकीजवळील एका जांभळाच्या झाडावर उभा होता. दरम्यान, झाडाला जांभळी लागल्याने ते तोडण्यासाठी झाडावर चढला. त्यात झाडाची फांदी तुटल्याने तो जमिनीवर पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा - घरातील किरकोळ कारणावरुन वाद, नवविवाहितेने उचलले धक्कादायक पाऊल

  पाच दिवसांवर विवाह असताना तरुणाचा दुर्दैवी अंत

  एरंडोल येथील महात्मा फुले पुतळा परिसरातील रहिवासी संजय विठ्ठल महाजन यांचा मोठा मुलगा भावेश याचा विवाह 25 एप्रिलला होणार होता. घरातील मोठ्या मुलाचा विवाह असल्यामुळे संजय महाजन आणि त्यांच्या परिवारात आनंदाचे वातावरण होते. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांना आज दुपारनंतर नवरदेव भावेश हा आपल्या काका ज्ञानेश्वर विठ्ठल महाजन यांच्या घरी गेला. तिथे त्याने काकांची दुचाकी मागितली. तुमची मोटरसायकल द्या, मी नाश्ता करायला जात आहे, असे सांगून भावेश काकांची दुचाकी घेऊन गेला होता.

  बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश मोटरसायकल घेवून न आल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन यांनी चौकशी केली. पण तो अद्याप घरी आला नव्हता. काही वेळानंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी त्यांचे काका ज्ञानेश्वर महाजन यांना फोन करुन दुखद बातमी सांगितली. भावेश हा धरणगाव रस्त्यावरील त्याच्या शेताच्याजवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे त्याच्या भावंडांनी काकांना सांगितलं. ज्ञानेश्वर महाजन हे त्यांचे नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले. त्यांनी भावेशला परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी भावेशचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Death, Jalgaon

  पुढील बातम्या