मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे...' स्टेटस ठेवून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे...' स्टेटस ठेवून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने WhatsApp वर स्टेटस ठेवलं होतं. 'मी जातोय...माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे' असं स्टेटस ठेवून नंतर आत्महत्या केल्याची माहिती आहे.

  नवी दिल्ली, 22 डिसेंबर : एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील (Rajasthan) बारांमध्ये तरुणाने आपलं जीवन संपवलं. जलवाडा कस्बे येथे मंगळवारी सकाळी आई आपल्या मुलाला त्याच्या रुममध्ये उठवण्यासाठी गेली असता, तिला मुलगा लटकलेल्या अवस्थेत मिळाला. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने WhatsApp वर स्टेटस ठेवलं होतं. 'मी जातोय...माझं आयुष्य माझी वाट पाहत आहे' असं स्टेटस ठेवून नंतर आत्महत्या केल्याची माहिती आहे.

  YouTube Video पाहून टाकला जबरी दरोडा, पुरावा शोधताना पोलिसांचीही दमछाक

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये जलवाडा येथे राहणाऱ्या 24 वर्षीय ओमप्रकाश मेघवाल या तरुणाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. हा तरुण कस्बे येथे ई-मित्र दुकान चालवत होता. सोमवारी रात्री तो खोलीत झोपण्यासाठी गेला. रात्री जवळपास 12 वाजून 4 मिनिटांनी त्यांनी WhatsApp वर स्टेटस ठेवलं होतं. त्याच रात्री त्याने फाशी लावून आत्महत्या केली.

  डोळ्यावर स्कार्फ बांधून उच्चशिक्षित तरुणीची इमारतीवरून उडी,पुण्यातील घटनेने खळबळ

  मंगळवारी सकाळी 6 वाजता त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेल्यानंतर ओमप्रकाश खोलीत फाशी लावलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली, पोस्टमार्टम करुन मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.

  पत्नीला शेतात घेऊन गेला अन् कापले हातपाय; क्रूरता पाहून पोलिसांचा उडाला थरकाप

  मृत तरुणाकडे कोणतीही सुसाइट नोट मिळालेली नाही. परंतु कुटुंबियांनी पत्नीसोबत सुरू असलेल्या वादामुळे मानसिक तणावामुळे आपल्या मुलाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. पोलीस सध्या आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Rajasthan, Suicide

  पुढील बातम्या