मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'ऑनलाईन जुगारा'च्या व्यसनाने घेतला तरुणाचा बळी, लाखोंचं कर्ज झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

'ऑनलाईन जुगारा'च्या व्यसनाने घेतला तरुणाचा बळी, लाखोंचं कर्ज झाल्याने उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनानं एका तरुणाचा बळी घेतल्याची (Youth commits suicide due to online gambling) घटना नुकतीच समोर आली आहे.

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनानं एका तरुणाचा बळी घेतल्याची (Youth commits suicide due to online gambling) घटना नुकतीच समोर आली आहे.

ऑनलाईन जुगाराच्या व्यसनानं एका तरुणाचा बळी घेतल्याची (Youth commits suicide due to online gambling) घटना नुकतीच समोर आली आहे.

  • Published by:  desk news

चेन्नई, 12 ऑक्टोबर : ऑनलाईन जुगाराच्या व्यसनानं एका तरुणाचा बळी घेतल्याची (Youth commits suicide due to online gambling) घटना नुकतीच समोर आली आहे.  गेल्या काही वर्षांपासून या तरुणाला ऑनलाईन जुगार (Addiction of gambling) खेळण्याची सवय लागली होती. त्यात त्याने 5 लाखांपेक्षाही जास्त (Lost more than 5 lakh) रुपये गमावले होते. पैशांवरून झालेल्या वादानंतर (Commits suicide after fight with family members) या तरुणाने स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

ऑनलाईन जुगाराचं होतं व्यसन

तमिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यात राहणाऱ्या आनंदन नावाच्या तरुणाला ऑनलाईन जुगार खेळण्याचं व्यसन जडलं होतं. 31 वर्षांचा हा तरुण एका टेक-फार्म कंपनीमध्ये नोकरी करत होता. नोकरीतून मिळणाऱ्या पगाराचे सर्व पैसे तो जुगारावर लावत असे. जुगारातून एक दिवस आपण श्रीमंत होऊ आणि आपली सर्व स्वप्नं पूर्ण होतील, असं त्याला वाटत असे. मात्र प्रत्यक्षात उलटंच होत होतं. या व्यसनापायी तो दरमहा त्याच्याकडचे पैसे खर्च करत असे आणि त्याच्या हातात काहीच पैसे उरत नसत.

घरचे होते चिंतेत

आपल्या मुलाला नोकरी असूनदेखील तो घरी पैसे देत नसल्यामुळे घरच्यांना आश्चर्य वाटत होतं. आपला मुलगा त्याला मिळणाऱ्या पैशांचं काय करतो, असा प्रश्न घरच्यांना पडत असे. मात्र तो काहीतरी नियोजन करत असावा, असं वाटल्याने कुणीही त्याला थेट विचारणा केली नव्हती. आनंदनच्या घरची परिस्थिती गरीब आहे. त्याची आई शेतात मोलमजुरी करून चरितार्थ चालवते. आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या शेतकरी आईवडिलांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याला नोकरी लागल्यामुळे ते प्रचंड आजारी होते.

हे वाचा - रात्री 2 वाजता घरात शिरून कॉन्स्टेबलचा महिलेवर Rape; नातेवाईकांनी दिला बेदम चोप

गावातील घरी आत्महत्या

आनंदन एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गावी आला होता. मात्र त्याच्याकडचे पैसे संपले होते. त्यामुळे शहरात परत जाण्यासाठी त्याने नातेवाईकांकडे पैसे मागितले. नातेवाईकांनी त्याला पैसे दिले. मात्र त्याचवेळी तू पगाराचे पैसे घरी का देत नाहीस, अशी विचारणा केली. त्यावरून त्याची आणि नातेवाईकांची वादावादी झाली. काही वेळाने नातेवाईक कामासाठी शेतात गेल्यावर आनंदनने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनं सर्वांना जबर धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Suicide, Tamil nadu