मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मुलाने 800 किलोमीटर पाठलाग करून केला बापाच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड, हॉटेलमध्ये पकडलं रंगेहाथ

मुलाने 800 किलोमीटर पाठलाग करून केला बापाच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड, हॉटेलमध्ये पकडलं रंगेहाथ

आपल्या वडिलांचा 800 किलोमीटर पाठलाग करून (Youth caught his father red handed with his girlfriend) मुलाने त्यांच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड केल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  desk news

उज्जैन, 12 ऑक्टोबर : आपल्या वडिलांचा 800 किलोमीटर पाठलाग करून (Youth caught his father red handed with his girlfriend) मुलाने त्यांच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड केल्याची घटना घडली आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरात आपल्या प्रेयसीसोबत उतरलेल्या वडिलांना त्यांच्या मुलाने रंगेहाथ पकडलं आणि आपल्या आईचा संशय खरा ठरला. आपल्या वडिलांचा रोमान्स पकडण्यासाठी हा मुलगा ग्वालियरवरून जयपूर आणि जयपूरवरून उज्जैनपर्यंत पोहोचला.

काय आहे प्रकरण?

उज्जैन शहरात एका तरुणानं आपल्या वडिलांचं प्रेमप्रकरण चव्हाट्यावर आणलं आहे. 62 वर्षांच्या आलोक चौधरी यांचं 59 वर्षांच्या महिलेसोबत अफेअर होतं. चौधरी यांच्या पत्नीला या प्रकरणाची कुणकुण लागली होती. तिने आपल्या मुलाला वडिलांवर लक्ष ठेवायला सांगितलं. वडील कामानिमित्त बाहेर जाणार असल्याचं समजल्यानंतर पत्नीला संशय आला आणि तिने आपल्या मुलाला त्यांचा पाठलाग करायला सांगितलं. मुलानं दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील अगोदर जयपूरला गेले. जयपूरवरून  त्यांनी ट्रेन पकडली आणि प्रेयसीला घेऊन ते उज्जैनला गेले. उज्जैनमधील महाकाल मंदिरासमोरच्या मिलन हॉटेलमध्ये त्यांनी एक रुम बुक केली आणि तिथं एकत्र राहू लागले. त्यानंतर मुलानं दोघांना रंगेहाथ पकडलं.

मुलानं दिली माहिती

मुलानं दिलेल्या माहितीनुसार वडिलांचं प्रेमप्रकरण असल्याचा आईला संशय होता. आपल्या आईसाठी आपण हे काम केल्याचं त्यानं सांगितलं. या वयात वडिलांचं प्रेमप्रकरण समोर आल्यामुळे धक्का बसल्याचं त्यानं म्हटलं आहे. जेव्हा आपल्याला पहिल्यांदा याबाबत समजलं, तेव्हा आपला विश्वास बसत नव्हता. मात्र आईच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण वडिलांचा पाठलाग सुरू केल्याचं त्यानं सांगितलं. सत्य काय आहे, ते जाणून घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नव्हती. त्यामुळेच आपण तीन राज्य ओलांडून आणि 800 किलोमीटरचा प्रवास करून हे काम पूर्ण केल्याचं त्यानं सांगितलं

First published:

Tags: Father, Women extramarital affair