मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रस्त्याच्या बाजूलाच तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, बीडमधील खळबळजनक घटना

रस्त्याच्या बाजूलाच तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, बीडमधील खळबळजनक घटना

आज सकाळी शिवदरा रस्त्यावर असलेल्या डोंगर आणि मोकळ्या जागेत स्थानिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

आज सकाळी शिवदरा रस्त्यावर असलेल्या डोंगर आणि मोकळ्या जागेत स्थानिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

आज सकाळी शिवदरा रस्त्यावर असलेल्या डोंगर आणि मोकळ्या जागेत स्थानिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

बीड, 11 जानेवारी : बीड (Beed) शहरालगत असलेल्या चऱ्हाटा-शिवदरा रस्त्यालगत एका 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील अंकुशनगर येथील प्रकाश गायकवाड असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. शहराजवळील शिवदरा रस्त्यावर प्रकाश गायकवाड या तरुणांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना पहाटे घडली होती.

कॅप्टनची रजा, 9 जणांना इजा, 36 ALL OUT नंतरचा अजिंक्य रहाणेचा संघर्ष

आज सकाळी शिवदरा रस्त्यावर असलेल्या डोंगर आणि मोकळ्या जागेत स्थानिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले.

पॉर्न व्हिडीओ पाहून शारीरिक संबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू की हत्या? प्रेयसीला अटक

मयत हा प्रकाश गायकवाड नावाचा व्यक्ती असल्याची ओळख पटली होती. प्रकाश हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. अंकुशनगर भागात राहणाऱ्या प्रकाशचा खून कोणी केला याचा तपास लावण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:
top videos