मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं, नंतर वाद, नाराज प्रियकराचं टोकाचं पाऊल, गोंदियातील धक्कादायक प्रकार

एव्हरग्रीन हॉटेलमध्ये प्रेयसीला नेलं, नंतर वाद, नाराज प्रियकराचं टोकाचं पाऊल, गोंदियातील धक्कादायक प्रकार

हॉटेलमध्ये प्रेयसीसोबतच्या वादानंतर तरुणाचं टोकाचं पाऊल

हॉटेलमध्ये प्रेयसीसोबतच्या वादानंतर तरुणाचं टोकाचं पाऊल

प्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदियातून समोर आली आहे.

  • Published by:  Chetan Patil
रवी सपाटे, गोंदिया, 19 ऑगस्ट : गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका शुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणानंतर प्रियकराने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा शहरात आहे. प्रियकरावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रेयसीवर नाराज झालेल्या एका तरुणाने संतापात टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. या तरुणाने प्रेयसीवर नाराज होवून थेट स्वत:चा जीव संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या तरुणाने विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदियातील एव्हरग्रीन हॉटेलमध्ये संबंधित घटना घडली आहे. विशेष म्हणजे एव्हरग्रीन हॉटेलमध्ये गेल्या आठ महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या हॉटेलमध्ये घडत असलेल्या सततच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी, बाळासाहेब थोरातांच्या भावावर गुन्हा दाखल) एव्हरग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्रियकराचे शतक जांगडे असं नाव आहे. तो 23 वर्षांचा आहे. तसेत तो गोंदियातील आंबाटोली फुलचुर येथील रहिवासी आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये थांबला असताना दोघांमध्ये भांडण झालं. या भांडणाच्या रागातून शतकने विष प्राशन करून टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. शतकने टोकाचा निर्णय घेतल्यानंतर हॉटेल प्रशासनाला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सध्या प्रियकरावर गोंदियातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान, तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घेण्याआधी आपल्या कुटुंबियांचा आणि आई-वडिलांचा विचार करायला हवा होता, अशी चर्चा सध्या शहरात सुरु आहे. आयुष्यात कितीही मोठं संकट कोसळलं किंवा काहीही झालं तरी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेवू नये. कारण आत्महत्या हे त्यावरील सोल्यूशन नाही. आत्महत्या ही पळवाट आहे. आत्महत्या केल्याने प्रश्न किंवा समस्या सुटत नाही. उलट अनेक प्रश्न निरुत्तरीत राहून जातात. अनेकांचं मोठं नुकसान होतं. विशेषत: कुटुंबियांचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन नेहमी केलं जातं.
First published:

Tags: Crime, Suicide

पुढील बातम्या