तरुणींची छेड काढणाऱ्यां 'मजनूं'ची तक्रार केल्याने दिवाळीतच तलवारीने हल्ला

तरुणींची छेड काढणाऱ्यां 'मजनूं'ची तक्रार केल्याने दिवाळीतच तलवारीने हल्ला

दारू पिऊन महिला आणि तरुणींची छेड काढणे हाच त्या तरुणांचा उद्योग होता. मात्र तक्रारीनंतरही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती.

  • Share this:

विजय देसाई, विरार 29 ऑक्टोंबर : मद्यपान करून तरुणींची छेड काढणाऱ्या तरुणांनी त्यांची तक्रार केली म्हणून तलवारीनेच हल्ला केलाय. यात दोन जण गंभीर जखमी झालेत. हे मजनू दारू पिऊन धिंगाणा घालतात, तरुणींची छेड काढतात त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांची तक्रार केली होती त्याचाच राग येऊन या तरुणांनी दिवाळीच्या दिवसी दोन भावांवर तलवारीने हल्ला केला. त्यात त्यात ते दोघेही जण गंभीर जखमी झालेत. मिरा रोडच्या गीता नगर मध्ये ही घटना घडलीय. मिरा रोडच्या गीता नगर मध्ये लक्षीपूजनच्या रात्री काही युवकांनी सोसायटीच्या लोकांवर तलवारीने हल्ला केला. या घटनेत दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. सर्व प्रकरण सोसायटीच्या सीसीटीव्ही मध्येही  कैद झाला.

निवडणुकीत 'लढणा'रे दोन नेते जेव्हा समोरासमोर येता तेव्हा...

गीतानगर फेस आठ सोसायटीच्या पाठीमागे एक रिकामा बंगला आहे. या बंगल्यात काही  युवक रात्र भर मद्यपान करतात आणि या बाजूने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांशी, तरुणींची छेड काढतात. तसेच युवकांशी मारपीट करतात त्यामुळे गीता नगर तसेच आजूबाजूच्या सोसायटीचे लोकांना खूप त्रास होतो.

भाजप-शिवसेनेत मतभेद, सत्तावाटपाची पहिलीच बैठक रद्द

गेल्या चार-पास वर्षांपासून अशीच परिस्थिती आहे. गीता नगर सोसायटीच्या लोकांनी याची वारंवार तक्रार केली होती त्यामुळे या नशेखोर युवकांच्या मनात राग होता. त्या रागातूनच त्यांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात गीता नगर सोसायटीचे सचिन आणि रोहन सिंह हे दोन सख्खे भाऊ जखमी झाले.  सोसायटीच्या लोकांनी या हल्ल्याची  तक्रार मिरा रोडच्या नया नगर पोलिस स्टेशनमध्ये केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून दोन आरोपी बंटी आणि नोमान सैय्यदला अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 06:23 PM IST

ताज्या बातम्या