इंदूर, 11 ऑगस्ट : एकतर्फी प्रेमात (one way love) वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीला धडा शिकवण्याच्या हेतूने तिच्या घरात घुसून तिच्यावर ब्लेडने हल्ला (blade attack) केला. या तरुणाने ब्लेडच्या साहाय्याने तरुणीच्या चेहऱ्यावर वार (attack on face) केले. यात तरुणी गंभीर जखमी (seriously injured) झाली असून तिला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर तरुणाला पोलिसांनी बेड्या (arrested) ठोकल्या आहेत.
इंदूरमधील आझाद नगर परिसरात राहणाऱ्या अकरम नावाच्या तरुणाचं एका तरुणीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रेम होतं. मात्र तरुणी त्याला कुठलाही प्रतिसाद देत नव्हती. तरुणीचं 5 वर्षांपूर्वी लग्नदेखील झालं होतं. मात्र तरीही अकरम तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिला भेटण्याचा तो प्रयत्न करत असे. तिने पतीला सोडून आपल्यासोबत यावं, अशी मागणीदेखील तो तिच्याकडे करत असे. मात्र त्याच्या या वर्तनाकडे तरुणी दुर्लक्ष करत होती.
तरुणी प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यावर वेडापिसा झालेला हा तरुण ब्लेड घेऊन थेट तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर हल्ला चढवला. सर्वप्रथम त्याने तिच्या गालांवर ब्लेडने सपासप वार केले. नेमकं काय घडतंय, हे कळण्यापूर्वीच तरुणी गंभीर जखमी झाली. आरडाओरडा ऐकूऩ घरातील आणि आजूबाजूचे धावून येत असल्याचं पाहून या तरुणाने तिथून पळ काढला. मात्र तोपर्यंत तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
हे वाचा -बुलडाण्यात मेंढपाळ आणि वनकर्मचाऱ्यांत तुफान राडा;जीव वाचवण्यासाठी झाडल्या गोळ्या
आरोपी तरुण आणि या तरुणीचं घर एकाच भागात समोरासमोर आहे. या प्रकारानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीच्या वडिलांनी पाच वर्षांपूर्वी तिचं लग्न लावून दिलं होतं. सध्या माहेरी आणखी एक लग्नकार्य असल्यामुळे ती माहेरी आली होती. ही संधी साधून माथेफिरू तरुणानं तिच्यावर हल्ला केला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Indore, Indore News