आनिस शेख, प्रतिनिधी
देहुरोड, 30 नोव्हेंबर : मुळशी (Mulshi) गावातील एका गटासोबत वाद झाला म्हणून बेकायेदशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या व्यक्तीला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल (Pistol) आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. देहुरोड शहरात (Dehu road Police) नव्याने पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनीही कारवाई केली आहे.
देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत साईनगर भागात बेकायदेशीररित्या एक व्यक्ती स्वता: जवळ पिस्तुल बाळगत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोंडे यांना मिळाली होती. त्यानुसार डी बी पथकातील कर्मचारी शाम शिंदे तसंच दादा जगताप यांना तत्काळ मार्गदर्शक सुचना देत संबंधीत व्यक्तीबाबत शोध घेण्यास रवाना करण्यात आले.
पेट्रोल पंपावरच ओमनी व्हॅनला लागली आग, भिवंडीतील घटनेचा थरारक VIDEO
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर मामुर्डी येथे पोलिसांना एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळून आला होता. त्याची विचार विचारपूस तसंच अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल अशोक कालेकर असं सांगितले.
त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गजेवार यांनी अधिक चौकशी केली असता, त्याने हे पिस्तुल मागील काही दिवसांपूर्वी मुळशी येथील तरुणांशी झालेल्या वादातून स्वतःचे आत्मसंरक्षण करण्यासाठी जवळ बाळगले असल्याचे सांगितले. तसंच पवनानगर येथील अमोल ज्ञानेश्वर दळवी या तरुणाकडून त्याने हे पिस्तुल घेतल्याचे सांगितले.
बापरे! तब्बल 50 वर्षे नाकात अडकलेलं नाण डॉक्टरांनी काढलं
पोलिसांनी तात्काळ पिस्तुल देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता मावळ येथील पवनानगर येथून अमोल दळवी या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडूनही एक फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 'झिरो टॉलरन्स' या उपक्रमाअंतर्गत शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, आता देहूरोड शहरातील पोलीस ठाणे सक्रिय झाले असून शहरातील गुन्हेगारी कारवाया करणार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune crime