मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात चाललंय तरी काय? मायलेकी घरात असताना नग्न अवस्थेत घरात शिरला तरुण अन्...

पुण्यात चाललंय तरी काय? मायलेकी घरात असताना नग्न अवस्थेत घरात शिरला तरुण अन्...

ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील पानमळा वसाहत येथे उघडकीस आली.

ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील पानमळा वसाहत येथे उघडकीस आली.

ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील पानमळा वसाहत येथे उघडकीस आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 12 सप्टेंबर : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एका बापाने आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मायलेकी घरात असताना चक्क एक तरुण नग्न अवस्थेत घरात शिरला. यावेळी त्याने या घरातील मुलीसोबत अश्लिल बोलून तिचा विनयभंगही केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील पानमळा वसाहत येथे उघडकीस आली. शनिवारी दुपारच्या सुमारास मायलेकी दोघीच असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी एका एका 35 वर्षीय विवाहित महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनय दत्तात्रय वाघमारे, असे आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घरात असताना आरोपी पूर्ण नग्न अवस्थेत घरात शिरला. यावेळी त्याने फिर्यादी महिलेच्या मुलीचा हात पकडला आणि तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या बहिणीच्या हातावर जड वस्तूने वार करत तिला जखमी केले. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भाजपचे नेत्याच्या फार्महाऊसवर घडली घटना, आरोपी अटकेत

सख्ख्या बापाकडूनच तरुण मुलीचे लैंगिक शोषण

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही संतापजनक घटना पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम पित्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पित्याचे वय 51 इतके आहे. तर पीडित तरुणीचे वय 19 आहे. मिळाळेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास पीडित मुलगी आणि तिचे वडील असे दोघेच घरात होते. त्यावेळी आरोपी नराधम पित्याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले.

First published:

Tags: Pune crime news