Home /News /crime /

लहान भाऊ मोठ्याच्या जीवावर उठला, रस्त्यावर पाडून चाकूने केले वार, LIVE VIDEO

लहान भाऊ मोठ्याच्या जीवावर उठला, रस्त्यावर पाडून चाकूने केले वार, LIVE VIDEO

लहान भावाने आपल्याच मोठ्या भावाचा पाठलाग करून भर रस्त्यावर तलवारी आणि चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे.

    नागपूर, 12 ऑगस्ट : नागपूरमध्ये खून आणि हत्याच्या घटनेचं सत्र सुरूच आहे. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जमिनीच्या वादातून लहान भावाने आपल्याच मोठ्या भावाचा पाठलाग करून भर रस्त्यावर तलवारी आणि चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. नागपूरच्या मानकापूर भागात सोमवारी रात्री 10 ही घटना घडली आहे. या घटनेत अमीन अली सय्यद (वय 41) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शेख अमीन आणि त्याचा लहान  भाऊ आसिफ अली सय्यद या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता. प्रॉपर्टीचा वाद इतका विकोपाला गेला की, दोघे भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले. सोमवारी रात्री मृत अमीन आणि आसिफ यांच्यात पुन्हा एकदा प्रॉपर्टीच्या वादावरुन कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आसिफने आपल्या चार मित्रांना बोलावले आणि मोठा भाऊ अमीनवर हल्ला केला. अमिनवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याने पळ काढला. पण, आसिफ आणि त्याच्या मित्रांनी तलवारी, रॉड आणि चाकू घेऊन अमीनचा पाठलाग केला. काही अंतर पळाल्यानंतर तिघांनी अमीनला गाठले आणि खाली पाडले. त्यानंतर सपासप वार करून अमीनचा खून केला. लहान भावाने भर रस्त्यावर मोठ्या भावाला चाकूने भोसकून ठार मारले. याच भागात असलेल्या एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. बुलडाण्यातील धक्कादायक घटना, भिंत कोसळून माय-लेकीचा मृत्यू अमीन रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानकापूरचा पोलीस ताफा, गुन्हे शाखेचा ताफा घटनास्थळी पोहोचला. काही तासांतच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. हत्येसाठी वापरलेली एक गाडीही पोलिसांनी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत अमीनवरही याआधी गुन्हा दाखल होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या