Home /News /crime /

धक्कादायक मृत्यू : कोरोना संशयित म्हणून तरुणीला बसमधून फेकलं

धक्कादायक मृत्यू : कोरोना संशयित म्हणून तरुणीला बसमधून फेकलं

बसमधून फेकल्यामुळेच मृत्यू झाल्याचा तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप आहे, तर पोलिसांनी मात्र हा नैसर्गिक मृत्यू असल्याने तक्रार दाखल करण्यास नकार दिलाय.

    नोएडा (उत्तर प्रदेश), 4 जुलै : कोरोनाची संशयित रुग्ण(Coronavirus) असल्याचं समजून बसमधून एका 19 वर्षाच्या मुलीला बसमधून फेकून देण्यात आलं. या तरुणीचा मृत्यू झाला आहे. बसमधून फेकल्यामुळेच मृत्यू झाल्याचा तरुणीच्या नातेवाईकांचा आरोप आहे, तर पोलिसांनी मात्र हा नैसर्गिक मृत्यू असल्याने तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याची बातमी आहे. दिल्लीजवळ उत्तर प्रदेशातल्या नोएडा इथे ही घटना घडली. UP रोडवेजच्या बसने ही युवती नोएडाहून तिचं गाव असलेल्या सिकोहबादला निघाली होती. आई आणि बहीण बसमध्ये चढल्या तेव्हा तिची प्रकृती ठणठणीत होती, असा दावा या तरुणीच्या भावाने केला आहे. बसमधून फेकल्यामुळेच मृत्यू झाल्याचा त्याचा आरोप आहे. यूपी रोडवेजच्या या बसमधून प्रवास करणारी तरुणी आजारी दिसल्यावर तिला बसमधल्या कर्मचाऱ्यांनी खाली उतरायला सांगितलं. तिला कोरोनाची लागण झाल्याचा त्यांना संशय होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षांच्या अंशिका नावाच्या या तरुणीचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला आहे. तिच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा झटापट झाल्याच्या कुठल्याही खुणा नव्हत्या, असं पोलिसांनी सांगितलं. हा नैसर्गिक मृत्यू असल्याने गुन्हा नोंदवला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोस्ट मार्टेमचा रिपोर्टसुद्धा नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सब इन्स्पेक्टरच्या कारनं महिलेला चिरडलं, अंगावर शहारे आणणारा अपघाताचा LIVE VIDEO अंशिकाच्या भावाचा आरोप आहे की, 'आपली बहीण बसमध्ये बसण्यापूर्वी बरी होती. उकाड्यामुळे जीव घाबरा होऊन तिची शुद्ध हरपली होती. बसमधून तिला जबरदस्तीने उतरवण्यात आलं. मथुरा टोल प्लाझाजवळ तिला खाली फेकण्यात आलं. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.' या मृत तरुणीचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून नोएडात नोकरी करतात. Coronavirus चा प्रादुर्भाव दिल्ली- नोएडात वाढल्यानंतर त्यांनी आपल्या गावी जायचा निर्णय घेतला. संकलन - अरुंधती
    First published:

    पुढील बातम्या