• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • बलात्कार झाले, आता हुंड्यासाठी तरुणीचा गेला जीव; काही हजारांच्या बाईकसाठी पत्नीला संपवल

बलात्कार झाले, आता हुंड्यासाठी तरुणीचा गेला जीव; काही हजारांच्या बाईकसाठी पत्नीला संपवल

बलात्कार, हुंडांबळी, छेडछाड...महिलांना आणखी किती संकट पाहावी लागणार आहे. या अत्याचारात आतापर्यंत अनेक महिलांचे बळी गेले आहे.

 • Share this:

  छत्तीसगड, 17 सप्टेंबर : छत्तीसगडमधील (Chhattisgarh Crime News) मुंगेली जिल्ह्यात शुक्रवारी एका नवविवाहितेच्या (Newly Married Girl) हत्याची घटना समोर आली आहे. लग्नात हुंडा (Dowry Case) दिला नाही म्हणून तरुणीची हत्या (Murder) करण्यात आली. हुंड्यात बाईक देण्यावरुन नवविवाहित दाम्पत्यांमध्ये वाद सुरू होता. हे प्रकरण इतकं वाढलं की, तरुणाने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केलं असून या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. (young woman killed  for the dowry, Finished wife for a few thousand rupees bikes) मिळालेल्या माहितीनुसार, सिंघनपुरी गावात राहणारा राहुल साहू याचं लग्न 7 महिन्यांपूर्वी कवर्धा जिल्ह्यातील पुसेरा गावातील आरतीसोबत झालं होतं. दोघांमध्ये सुरुवातील सर्व ठीक सुरू होतं. मात्र काही दिवसांनंतर राहुल आरतीला हुंड्यासाठी त्रास देऊ लागला. राहुल आरतीच्या सासरच्या मंडळींकडून बाईकची मागणी करू लागला. यावरुन पती-पत्नींमध्ये वारंवार (Disputes between husband and wife) वाद सुरू होता. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यानंतर मात्र राहुल आरतीला वारंवार मारहाण करू लागला. याबाबत आरतीने कुटुंबीयांना कळवलं. यादरम्यान 15 सप्टेंबर रोजी राहुलने आरतीची हत्या केली. हत्येनंतर आरतीच्या कुटुंबीयांना सांगितलं की, चहा करताना हिटरचा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला. हे ही वाचा-संतापजनक! अगोदर केला 60 वर्षांच्या महिलेचा खून, मग प्रेतावर केला बलात्कार आरतीच्या गळ्यावर सापडल्या खुणा हत्येनंतर आरतीच्या कुटुंबीयांनी राहुलवर संशय व्यक्त केला. अंत्यसंस्कारापूर्वी त्यांनी आरतीचं शरीर तपासलं. तेव्हा आरतीच्या गळ्याभोवती मारहाणीच्या खुमा दिसल्या. यावरुन आरतीचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावलं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तर आरोपीनेही हत्येची कबुली दिली आहे.

   

  Published by:Meenal Gangurde
  First published: