मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

महाराष्ट्रातील घटनेची हिमाचल प्रदेशमध्ये पुनरावृत्ती, युवा पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्रातील घटनेची हिमाचल प्रदेशमध्ये पुनरावृत्ती, युवा पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

विनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते.

विनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते.

विनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते.

  • Published by:  News18 Desk
हमीरपूर, 23 सप्टेंबर : महाराष्ट्रात एका दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. याठिकाणीही एका तरुण दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातील भोरंज उपविभागातील बेहडविन गावात ही घटना घडली. पती-पत्नीने विषारी द्रव्य पित आत्महत्या केली. दोघे पती-पत्नी बेहडवी गावातीलच रहिवासी होते. प्रिती असे मृत पत्नीचे नाव आहे. तर विनोदकुमार विक्रम सिंह असे मृत तरुण पतीचे नाव आहे. विनोद कुमार हा राज्य विद्युत मंडळात सहकारी म्हणून कार्यरत होते. तसेच विनोद आणि प्रितीच्या लग्नाला जेमतेम वर्ष झाले होते. दोघांनी बुधवारी रात्री काही विषारी द्रव्य घेतले होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावली. दोघांनीही विषारी द्रव्य घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना भोरंज येथील शासकीय रुग्णालयात येथे दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेडिकल कॉलेज हमीरपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र, हमीरपूर वैद्यकीय महाविद्यालयातही त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी आयजीएमसी शिमला येथे पाठवण्यात आले. मात्र, तेथे गुरुवारी रात्री उशिरा रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून पती-पत्नीचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरू केला आहे. तर दोघांनीही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही, असे भोरंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सूरम सिंह यांनी सांगितले. हेही वाचा - लग्नाच्या 6 महिन्यानंतर विवाहित तरुणीचं टोकाचं पाऊल, आईने मुलीच्या प्रियकरावर लावला हा आरोप महाराष्ट्रातही पती पत्नीची आत्महत्या - महाराष्ट्रात एका दाम्प्त्याने मूल होत नसल्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यातील कणूर गावात घडली आहे. तानाजी राजपुरे आणि पत्नी पुजा राजपुरे अशी मृतांची नावं आहेत. या दोघांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, 10 वर्षांच्या त्यांच्या संसाराचा अतिशय हृदयद्रावक अंत झाला आहे. लग्नाला दहा वर्ष होऊनही मूल होत नसल्याने दोघंही चिंतेत होते. मूल होत नसल्याने वैद्यकीय उपचारही सुरू होते. मात्र, त्यालाही यश आलं नाही. अखेर या दुःखातून त्यांनी हे पाऊल उचललं.
First published:

Tags: Crime news, Himachal pradesh, Wife and husband

पुढील बातम्या