Home /News /crime /

खळबळजनक! नुपूर शर्माला समर्थन दिलं म्हणून भरदिवसा दुकानात घुसून गळा चिरला, जागीच मृत्यू

खळबळजनक! नुपूर शर्माला समर्थन दिलं म्हणून भरदिवसा दुकानात घुसून गळा चिरला, जागीच मृत्यू

गेल्या अनेक दिवसांपासून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्याने पोलिसात सांगितलं तर त्याला केवळ सावध राहण्याचा सल्ला दिला.

  जयपूर, 28 जून : राजस्थानच्या (Rajasthan News) उदयपूरमध्ये 10 दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज मंगळवारी भरदिवसा त्याच्या दुकानात शिरून तलवारीने अनेक वार करण्यात आले आणि त्याचा गळा (killed for supporting Nupur Sharma) कापण्यात आला. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. इतकच नाही तर आरोपीने घटनेनंतर सोशल मीडियावर हत्येची जबाबदारी घेतली आहे. कपड्यांचं माप देण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले... कन्हैयालाल तेली (40) या व्यक्तीचं धानमंडी स्थित भूतमहलजवळ सुप्रीम टेलर्स नावाचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी साधारण अडीच वाजता बाईकवरुन दोन अज्ञात व्यक्ती त्याच्या दुकानात शिरले. कपड्यांचं माप देण्याचं कारण सांगून ते त्याच्या दुकानात शिरले. त्याला काही कळायच्या आत कन्हैयालालवर तलवारीने हल्ला केला. त्याचा गळाही चिरण्यात आला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

  FSL टीम घटनास्थळी दाखल... सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल जाले. याशिवाय FSL ची टीमही घटनास्थळी पोहोचली. कन्हैयालाल गोर्वधन विलास भागात राहत होता. 10 दिवसांपूर्वी त्याने भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती. यामुळे कन्हैयालाल त्रस्त झाला होता. त्यानंतर पुढील 6 दिवस त्याने दुकान बंद ठेवलं होतं. त्याने धमकी देणाऱ्या तरुणांविरोधात पोलीस ठाण्यात रिपोर्टही दाखल केला होता. पोलिसांनी त्याला केवळ सावध राहण्याचा सल्ला दिला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Rajasthan

  पुढील बातम्या