लग्नाच्या वरातीत तरुणावर चाकूने हल्ला, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
लग्नाच्या वरातीत तरुणावर चाकूने हल्ला, उल्हासनगरमधील धक्कादायक घटना
कांलिदी गोल्डमध्ये राहणारी अंशू लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपर्यंत आरोपी पती हर्ष शर्मा याच्या कंपनीत काम करीत होती. यादरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं व ऑगस्ट महिन्यात दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केलं. तो जावरा कंपाऊंडमधील हर्ष शर्मा याच्या घरात राहत होती.
खेमानी येथील रस्त्यावरून लग्नाची वरात जात असताना गर्दीतून एक दुचाकीस्वार दुचाकी चालवत होता. यावेळी वरतीमधील एकाला दुचाकीची ठोकर लागली.
गणेश गायकवाड, प्रतिनिधीउल्हासनगर, 17 जानेवारी : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) लग्नाच्या वरातीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीमुळे एका जणावर चाकूने हल्ला (Knife attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प नंबर 3 च्या खेमानी परिसरातून शुक्रवारी सायंकाळी ही वरात विवाहस्थळी जात होती. त्यावेळेस हा हल्ला करण्यात आला. या वरातीमधील रितेश शर्मा यांच्यावर वार झाले आहेत. रितेश हे धुळ्याहून आपल्या मेव्हण्याच्या मुलाच्या लग्नासाठी उल्हासनगरला आले होते. दरम्यान, खेमानी येथील रस्त्यावरून लग्नाची वरात जात असताना गर्दीतून एक दुचाकीस्वार दुचाकी चालवत होता.
सर्वसामान्य जनतेला सुद्धा मोफत लस द्यावी, आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
यावेळी वरतीमधील एकाला दुचाकीची ठोकर लागली. त्यामुळे त्याच्यामध्ये वाद विवाद झाले. दरम्यान दुचाकीस्वार तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सोबत सहा ते सात लोकांना घेऊन आले आणि वरतीमधील वऱ्हाड्यांना मारहाण सुरू केली. तर एकाने जवळ बाळगलेल्या चाकूने रितेश शर्मा त्यांच्यावर वार केले. यात शर्मा त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'तुला परत मानलं रे ठाकूर', शार्दुलच्या बॅटिंगवर विराटची मराठमोळी प्रतिक्रिया
या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी मात्र यावर काही प्रतिक्रीया दिली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.