हैदर शेख, प्रतिनिधी
चंद्रपूर, 28 नोव्हेंबर : चंद्रपूर (chandrpur) जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महालगावात एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर गावातील तरुणाने अतिप्रसंग (Rape) केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या प्रकरणी 34 वर्षीय नराधमाला अटक केली आहे.
चिमूर तालुक्यातील महालगावात ( काळु ) इथं शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. गावात राहणारे वृद्ध दाम्पत्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 90 वर्षीय वृद्ध महिला घरी एकटी असल्याचे पाहुन गावातील युवकाने घरात शिरला आणि वीज घालवून आतिप्रसंग केला. या प्रकरणी वृद्धेच्या पतीने पोलिसांमध्ये तोंडी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी नराधम युवकास अटक केली आहे.
भयंकर! वाघांचा लोकांवर हल्ला, एका उडीत तरुणावर घातली झडप, पाहा थरारक VIDEO
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 90 वर्षीय पीडित वृद्ध महिला आपल्या घरी झोपलेली होती. त्यावेळी गावात राहणारा आरोपी नरेंद्र संभाजी नन्नावरे (वय 34) हा वृद्धेच्या घरात शिरला. वीज घालवून त्याने वृद्धेवर अतिप्रंसग केला. वृद्धेने अत्याचाराची माहिती पतीला दिली.
त्यानंतर पतीने भिसी पोलीस स्टेशन गाठून तोंडी तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नरेंद्र नन्नावरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 376,450,323 नुसार गून्हा नोंदवून अटक केली आहे. पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे. परिसरात आरोपी युवकाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
पैठणमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडली आहे. यात एका 8 वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. तर 6 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रालयात अनेक झारीतले शुक्राचार्य, छगन भुजबळ यांचं मोठं विधान
पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात ही घटना घडली आहे. भल्यापहाटे हे हत्याकांड घडले आहे. अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून संभाजी निवारे यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघात हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, 8 वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या हल्ल्यातून त्यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. परंतु, जखमी झाला आहे. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संभाजी निवारे यांच्या कुटुंबीयाची हत्या केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील तिघांची का हत्या करण्यात आली, हत्येमागे हेतू काय आहे, याचा तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: चंद्रपूर