मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शेकोटीवरून वाद पेटला, गाडी फोडली म्हणून संतापलेल्या तरुणाने केला गोळीबार, पुण्यातली घटना

शेकोटीवरून वाद पेटला, गाडी फोडली म्हणून संतापलेल्या तरुणाने केला गोळीबार, पुण्यातली घटना

 चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले.

चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले.

चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 24 जानेवारी : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार करण्यात आल्याची घटना वडगाव शेरी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूलसमोर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी दोन तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते.

अमित सिंह असं जखमीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मा सनसिटीजवळ असलेल्या अर्नोल्ड स्कूलजवळ सागर गायकवाड, अक्षय खामकर, रोहित क्षत्रिय, रोहित जेधिया, सिद्धार्थ शिंदे आदी तरुण शेकोटी करीत बसलेले होते. त्या ठिकाणी अमित सिंह हा गेला. त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची सुरू झाली. या वादातून या अमित सिंह याची गाडी फोडण्यात आली.

चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे.

उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून चाकूनेच भोसकले

दरम्यान, नागपुरमधून आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ 20 रुपये उधारीवरुन झालेल्या वादातून चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील जरीपटका परिसरात घडली आहे.

या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून होता. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

First published:

Tags: Pune news, पुणे