मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Love Marriageकरून पत्नीला फसवलं, 8 महिन्यात उघडकीस आलं धक्कादायक वास्तव

Love Marriageकरून पत्नीला फसवलं, 8 महिन्यात उघडकीस आलं धक्कादायक वास्तव

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच विजयने घडलेली घटना सांगितली.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच विजयने घडलेली घटना सांगितली.

पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच विजयने घडलेली घटना सांगितली.

    दौसा 6 सप्टेंबर: राजस्थानमधल्या दौसा जिल्ह्यात एका घटनेने खळबळ उडाली आहे. 8 महिन्यापूर्वी प्रेम विवाह करणाऱ्या तरुणाने पत्नीची हत्या केली आणि मृतदेह घरातच ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर दोन दिवस त्याने मृतदेह आपल्याच घरात ठेवला होता त्यानंतर जेव्हा वास यायला सुरुवात झाली तेव्हा त्याने त्याची विल्हेवाट लावल्याचं स्पष्ट झालं. दौसा जवळच्या एका गावतली ही घटना आहे. विजय सैनी आणि त्यांची पत्नी गीता हे एका भाड्याच्या घरात राहात होते. घटनेच्या दोन दिवस आधी त्यांना त्यांच्या घरमालकाने पाहिलं होतं. त्यानंतर विजय हे एक पोतं घेऊन गाडीने बाहेर पडले अशी माहिती घर मालकाच्या मुलाने दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतल्यावर त्यांना धक्कादायक वास्तव कळालं. विजय आणि गीता यांचा प्रेम विवाह 8 महिन्यांपूर्वीच झाला होता. त्यानंतर ते इथे घर भाड्याने घेऊन राहू लागले. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर गीताचा मृतदेह स्मशानभूमीत सापडला होता. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच विजयने घडलेली घटना सांगितली. त्यानेच गीताची भांडण झाल्यानंतर हत्या केली होती. दोन दिवस त्याने मृतहेद घरातच ठेवला. त्यानंतर जेव्ह त्याचा वास यायला लागला तेव्हा त्याने रात्री तो मृतदेह बॅगमध्ये भरून बाहेर नेला आणि त्याचं दफन केलं. त्याने ही हत्या का केली याचं गुढ कायम असून तो पोलिसांना स्पष्टपणे सांगत नसल्याची माहितीही पुढे आली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला असून विजया अटक केली आहे. त्याच्या कुटुंबीयाकडेही पोलीस चौकसी करत असून यामागे दुसरा काही उद्देश आहे का याचाही शोध घेत आहेत.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या