मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Murder in Jalgaon : जळगाव पुन्हा हादरलं! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून, धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह

Murder in Jalgaon : जळगाव पुन्हा हादरलं! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून, धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह

शाहू नगर परिसरात असणार्‍या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह आढळून आला.

शाहू नगर परिसरात असणार्‍या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह आढळून आला.

शाहू नगर परिसरात असणार्‍या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह आढळून आला.

  • Published by:  News18 Desk
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी जळगाव, 20 जुलै : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील शाहू नगर परिसरात एकाचा खून झाल्याची घटना भर दिवसा घडली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण बातमी - शाहू नगर परिसरात असणार्‍या जळकी मीलच्या मोकळ्या मैदानाच्या बाजूला एका तरूणाचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह आढळून आला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृत व्यक्ती हा रहीम शहा उर्फ रमा हा असल्याची माहिती समोर आली. आज दुपारीच कुणी तरी अज्ञात मारेकर्‍यांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जून महिन्यात जळगावात घडली खुनाची घटना - दरम्यान, जळगावात मागच्याच महिन्यात जामिनावर आलेल्या सागर वासुदेव पाटील या एका आरोपीचा खून करण्यात आला होता. सागरकडून आरिफ शहा याने व्याजाचे पैसे घेतले होते. मात्र, घेतलेले पैसे परत करायला त्याला अडचणी येत होत्या. सागरला त्याने दिलेले पैसे परत मिळत नसल्यामुळे त्याने आरिफच्या घरी दोन वेळा जाऊन वाद घातला होता. यामुळे आरिफला त्याच्या वडिलांनी मारहाणही केली होती. यामुळे आरिफच्या मनात सागरबद्दल राग आला होता. हेही वाचा - किन्नराशी होते संबंध; बदनामीच्या भीतीनं मध्यरात्री बोलावलं आणि... यानंतर त्याने सागरला संपविण्याचा विचार केला. त्याने त्याप्रमाणे नियोजनही केले. त्यानुसार, त्याचा मित्र जुबेर शेख भिका सिकलिगर (वय 22, रा. मासुमवाडी) याला सोबत घेतले. तसेच सागरला दारू प्यायला बोलावले. मासळी बाजाराजवळ तिघांनी मद्यप्राशन केले. दारू चढल्याचे लक्षात आल्यानंतर सागरची दोघांनी मिळून हत्या केली. यानंतर दोघे तिथून फरार झाले. तर जूनमहिन्यानंतर जुलैमहिन्यात जळगावात भरदिवसा खून झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
First published:

Tags: Crime news, Jalgaon, Murder news

पुढील बातम्या