पाटणा, 30 मार्च: मित्राच्या बहिणीवर प्रेम करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मित्राचे आपल्याच बहिणीसोबत प्रेमसंबंध सुरू आहेत, हे समजल्यानंतर संतापलेल्या या तरुणाने आपल्या अन्य काही मित्रांच्या मदतीने बहिणीच्या प्रियकराची (Young man killed sister's boyfriend) दगडाने ठेचून हत्या (murder) केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. तर मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथीhल आहे. तर संबंधित 17 वर्षीय मृत तरुणाचं नाव लल्लू कुमार उर्फ नीरज असं असून तो खाजेकला पोलिस स्थानकाच्या हद्दीतील केशव राय गल्ली येथील रहिवासी आहे. करण कुमार, प्रकाश कुमार आणि राजा मल्लिक उर्फ सनी डोम या तीन युवकांनी मृत नीरजला वाढदिवसाची पार्टी साजरी करण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेले. रामदेव महतो सामुदायिक भवन परिसरात रात्री उशीरा वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर तिन्ही मित्रांनी नीरजची विट आणि दगडांनी ठेचून हत्या केली. यावेळी नीरजचा आणखी एक मित्रही त्याच्यासोबत आला होता. आरोपी युवकांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला पण त्याने घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला आहे.
जीव वाचवून पळालेल्या मृत नीरजच्या मित्राने संबंधित घटनेची माहिती नीरजच्या पालकांना दिली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने पावलं उचलली आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित छापेमारी करत आरोपी युवकांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हे ही वाचा-Rape Case: कुस्ती कोचचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, जीवे मारण्याचीही दिली धमकी
या प्रकरणी माहिती देताना पोलीस अधिकारी गौरीशंकर गुप्ता यांनी सांगितलं की, मृत युवक लल्लू कुमार उर्फ नीरजचं त्याचाच मित्र करण कुमारच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी याची माहिती करण कुमारला मिळाली. त्यामुळे करण कुमारचा मृत नीरजवर राग होता. त्यामुळे त्याने आपले अन्य मित्र प्रकाश कुमार आणि राजा मलिक यांच्यासोबत कट रचून नीरजची निर्घृण हत्या केली. प्रकाश कुमार आणि राजा मलिक हे दोघंही सराईत गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वीही असे गंभीर गुन्हे केले आहेत. सध्या पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Death, Friendship, Love, Murder, Relationship