मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /वाद मिटवण्याची चर्चा मुद्यावरून गुद्यावर, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

वाद मिटवण्याची चर्चा मुद्यावरून गुद्यावर, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील दोन जणांना शिर्डीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दोन जणांना शिर्डीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील दोन जणांना शिर्डीत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक, 11 जानेवारी : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दोन जणांना शिर्डीत (Shirdi) बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील दोन तरूण रविवारी शिर्डीत आले होते. राहुल जेजूरकर आणि प्रविण बनकर  या दोन तरुणांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद होता. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी राहुलला शिर्डीत बोलवण्यात आले होते. राहुल जेजूरकर आपला मित्र श्याम जेजूरकर याच्यासोबत शिर्डीत आला होता.

पॉर्न व्हिडीओ पाहून शारीरिक संबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू की हत्या? प्रेयसीला अटक

पण, शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर दोघांना रात्री 8 ते 11 वाजेच्या दरम्यान बेदम मारहाण करण्यात आली होती. दोन्ही तरुणांना लाथा-बुक्याने बेदम मारहाण करण्यात आली होती. जखमी अवस्थेत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, राहुल जेजुरकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शाम जेजुरकर हा तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर शिर्डीच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शिर्डी आणि राहाता पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. मयत राहुल जेजूरकर याचा मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर डॉक्टरांचा रिपोर्ट आणि जखमी तरूणाच्या फिर्यादीवरून दोषींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बीडमध्ये तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

दरम्यान, बीड शहरालगत असलेल्या चऱ्हाटा-शिवदरा रस्त्यालगत एका 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रकाश गायकवाड असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. शहराजवळील शिवदरा रस्त्यावर प्रकाश गायकवाड या तरुणांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना पहाटे घडली होती.

आज सकाळी शिवदरा रस्त्यावर असलेल्या डोंगर आणि मोकळ्या जागेत स्थानिकांना अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर स्थानिकांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos