मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गोड बोलून घरी बोलावलं अन्..; पुण्यात तरुणीनं कुटुंबीयांसह प्रियकराला डांबून दिला भयंकर मृत्यू

गोड बोलून घरी बोलावलं अन्..; पुण्यात तरुणीनं कुटुंबीयांसह प्रियकराला डांबून दिला भयंकर मृत्यू

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Murder in Pune: 8 दिवसांपूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका 21 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आरोपींनी त्याला जबरी मारहाण करत जीव घेतला होता. एका रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं होतं.

पुढे वाचा ...

पुणे, 24 मार्च: 8 दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) शिवणे परिसरात एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Brutal murder) करण्यात आली होती. आरोपींनी त्याला जबरी मारहाण (Beating) करत जीव घेतला होता. एका रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR lodged) करत तपास केला असता, ही हत्या तरुणाच्या प्रेयसीनं अन् तिच्या कुटुंबीयांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना अटक (5 Arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

प्रद्युम्न कांबळे असं हत्या झालेल्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील कोथरूड परिसरातील रहिवासी आहे. तर प्रेयसी प्राजक्ता विजय पायगुडे (19), अजय विजय पायगुडे (19), विजय किसन पायगुडे (50), वंदना विजय पायगुडे (40) आणि सागर गोविंद राठोड (21) असं अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावं आहेत. संबंधित पाचही जणांची कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रद्युम्न आणि आरोपी प्रेयसी प्राजक्ता दोघंही कोथरूड परिसरात एकमेकांच्या घराशेजारी राहत होते. कालातरांने त्यांच्यात प्रेमसंबंध (Love affair) जुळले. पण कालांतराने त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती प्राजक्ताच्या कुटुंबीयांना समजली. त्यामुळे ते कोथरूड परिसरातून वारजे याठिकाणी राहायला आले. याठिकाणी गेल्यानंतरही प्रद्युम्न प्राजक्ताचा पाठलाग करत होता. अनेकदा समजावून सांगितल्यानंतर देखील तो तिला वारंवार त्रास देत होता.

हेही वाचा-गर्लफ्रेंडच्या बाथरूममधून येत होता घाणेरडा वास; सत्य समोर येताच बॉयफ्रेंड हादरला

आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आरोपी प्राजक्ताने घटनेच्या दिवशी 16 मार्चरोजी फोन करून प्रद्युम्नला आपल्या घराजवळ बोलावून घेतलं. याठिकाणी प्रद्युम्न गेला असता, आरोपींनी त्याला घरात कोंडून मारहाण केली. लोखंडी रॉड, सिंमेटचे गट्टू आणि अन् प्राणघातक हत्यारांनी आरोपींनी तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या हत्येनंतर आरोपींनी त्याचा मृतदेह एका रस्त्याच्या कडेला फेकून दिला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आठ दिवसांत हत्येचं गूढ उलगडलं आहे. आरोपी प्रेयसी ही नर्सिंगचं शिक्षण घेते. या घटनेचा पुढील तपास वारजे पोलीस करत आहेत.

हेही वाचा- लग्नानंतर सोबत फिरत नसल्यानं उगवला सूड; पुण्यात तरुणानं मित्राची केली सिनेस्टाईल हत्या, कांड ऐकून पोलीसही हैराण

विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी प्राजक्ता अल्पवयीन असताना तिचे प्रद्युम्न सोबत संबंध आल्याची माहिती मिळाल्यावर त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात प्रद्युम्न 3 महिने तुरुंगात राहून आला होता. बाहेर आल्यावरही त्यानं प्राजक्तासोबत प्रेमसंबंध सुरूच ठेवले. मात्र कुटुंबीयांना ही गोष्ट मान्य नसल्याने त्यांनी प्राजक्ताला हाताशी धरून प्रद्युम्नचा कट रचून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder, Pune