मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /क्रूरतेचा कळस! तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण; लघुशंका पाजण्याचा केला प्रयत्न

क्रूरतेचा कळस! तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण; लघुशंका पाजण्याचा केला प्रयत्न

दीड तासाच्या पाठलाग करून अखेर आरोपीच्या मुसक्या अवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.

दीड तासाच्या पाठलाग करून अखेर आरोपीच्या मुसक्या अवळण्यात नेकनूर पोलिसांना यश आले आहे.

Crime in Barmer: अपहरण केलेल्या पीडित तरुणाला आरोपींनी लोखंडी रॉडने मारल्यानंतर त्याला जबरदस्तीने लघुशंका पाजण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral video)समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

बाडमेर, 24 मार्च: एका युवकाचं अपहरण करून त्याला बेदम मारल्याची (Young man kidnapping and beating) घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित तरुणाला लोखंडी रॉडने मारल्यानंतर त्याला जबरदस्तीने लघुशंका पाजण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral video)समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी केली जात आहे. चार ते पाच युवकांनी पीडित युवकासोबत हे घृणास्पद कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना राजस्थानातील बाडमेर येथील आहे. 8 मार्च रोजी येथील एका युवकाचं काही तरुणांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपी तरुणांनी पीडित तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणाला जबरदस्तीने लघुशंका पाजण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओही बनवून व्हायरल केला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवकाला मारहाण का झाली याची खुलासा अद्याप झाला नाही.

(हे वाचा-वांद्र्यातील ड्रग पुरवठा करणाऱ्याला NCBकडून अटक, चौकशीत अनेक कलाकारांची नावं उघड)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्हायरल व्हिडीओ सिणधरी पोलीस स्टेशन परिसरातील कोशलू या गावचा असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत पीडित युवकाच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणाच्या वडिलांनी  आपल्या तक्रारीत म्हटलं की,  8 मार्च रोजी हिराराम, जोगाराम आणि इतर दोन युवकांनी त्यांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आरोपींनी मुलाला बेदम मारहाण केली. त्याचबरोबर त्यालाही लघवी पाजण्याचा प्रयत्नही केला आहे.

हे ही वाचा-5 वर्षीय मुलीवर बलात्कार, अवघ्या 64 दिवसांत न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशी

पीडित युवकाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की,  आरोपींनी आपल्या मुलाकडून 5,000 हजार रुपयांची रोकड, मोबाईल, चांदीची फुलेही लुटले. याप्रकरणी पोलिसांनी डाबली येथील रहिवासी असलेल्या हिराराम आणि कोशलू येथील रहिवासी जोगाराम यांच्यासहित आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र अद्याप अपहरण व मारहाण का केली गेली? याचं नेमकं कारण समोर आलं नाही. सिंणधारी पोलीस अधिकारी बलदेवराम यांच्या नेतृत्वात विविध पथकं तयार करून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Rajasthan