लुधियाना, 29 जुलै : प्रेम विवाहाच्या 4 महिन्यांनंतर बीएच्या विद्यार्थ्याने मंगळवारी घरातच विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तरुणाने आपल्या मोबाइलवर एक व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ त्याने आपल्या छोट्या बहिणीला व्हॉट्सअॅप केला होता. यामध्ये त्याने आत्महत्येसाठी पत्नीसह, सासरच्या 6 मंडळींना जबाबदार धरलं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी व्हिडीओच्या आधारावर पत्नी रमनजीत कौरसह सहा जणांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा आरोप दाखल केला आहे. बुधवारी पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम करून कुटुंबीयांकडे सोपवलं. मृत तरुणाचं नाव सतनाम सिंग असून तो 23 वर्षांचा होता. तरुणाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतनाम याचा 4 महिन्यांपूर्वी परिसरात राहणाऱ्या रमनजोत कौर हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी सतनामच्या हातात काम नव्हतं, त्याने स्थानिक प्रशासन कार्यालयात नोकरीचा फॉर्म भरला होता. लग्नानंतर मात्र मुलाला सासरची मंडळी त्रास देऊ लागली. याचा उल्लेख त्याने व्हिडीओमध्ये केला आहे. सासरच्या मंडळींनी मुलाची बहीण आणि आईला खोट्या केसमध्ये अडकवण्याचीही धमकी दिली होती. याशिवाय प्रॉपर्टी घेऊन आई-वडिलांपासून वेगळं होण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने आपलं आयुष्यचं संपवलं.
हे ही वाचा-संतापजनक! 6 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; गुप्तांगावर वार करत मानही मोडली अन्...
नेट बंद असल्याने व्हिडीओ पाहून शकली नाही बहीण
तरुणाच्या वडिलांनी सांगितलं की, सतनामने सकाळी एका बागेत बसून हा व्हिडीओ शूट केला. जो साधाऱण दुपारी 1 वाजता छोटी बहीण राजविंदर कौर हिच्या मोबाइलवर पाठवला. मात्र मोबाइलचा रिचार्ज न केल्यामुळे नेट बंद होता. त्यामुळे ती व्हिडीओ पाहू शकली नाही. सायंकाळी साधारण 6.30 वाजता मुलगा घरी आला, त्यानंतर त्याची प्रकृती खराब होऊ लागली. कुटुंबीयांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. रात्री साधारण 12.30 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा बहिणीने मोबाइलवर व्हिडीओ पाहिला आणि वडिलांना याबाबत सांगितलं. जर बहिणीचा नेट सुरू असता तर कदाचित भावाला वाचवता आलं असतं. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Punjab, Suicide