पुणे, 16 फेब्रुवारी: पुण्यातील (Pune) सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाला अवघ्या आठ हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या (Young man commit suicide for 8000 rupees loan) करावी लागली आहे. कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपनीने कर्जाची वसूली करण्यासाठी घृणास्पद मार्ग अवलंबला आहे. अश्लील फोटो व्हायरल (Obscene photos viral) झाल्यानंतर पीडित कर्जदार तरुणानं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अनुग्रह ए पी प्रकाशन असं आत्महत्या करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो पुण्यातील माणिकबाग परिसरात वास्तव्याला असून तो मूळचा केरळातील रहिवासी आहे. या प्रकरणी औंध येथील नाईजिल राजन मटानकोट (31) यांनी फायनान्स कंपनीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. हा धक्कादायक प्रकार 26 ते 27 जानेवारी दरम्यान घडला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणावर केरळात जाऊन अंत्यसंस्कार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर 16 जणांकडून बलात्कार, शेळ्या चारण्यासाठी गेली होती जंगलात
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाला एका फायनान्स कंपनीतून फोन आला होता. तुमच्या आईनं 8 हजार रुपयांचं कर्ज घेतलं असून कर्जाचे हफ्ते फेडले नाहीत. तसेच कर्जाची मुद्दल देणंही बाकी असल्याचं समोरून सांगण्यात आलं आणि पैशांची मागणी केली. यानंतर फायनान्स कंपनीतील एका कर्मचाऱ्याने मृत प्रकाशन यांचे अश्लील फोटो आणि शिवीगाळ असलेले मेसेज त्यांचे सहकारी, मित्र आणि नातेवाईकांना पाठवले. नातेवाईकामध्ये बदनामी झाल्यानंतर संबंधित तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
हेही वाचा-प्यार हमे किस मोड पे ले आया; प्रेयसीच्या मागण्यांमुळे तरुण पोहोचला तुरुंगात
संबंधित फायनान्स कंपनीकडे तरुणाचे अश्लील फोटो आणि मेसेज कुठून आले? याची माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Suicide