मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आईशी भांडण करून रागाच्या भरात हाय होल्टेज विजेच्या खांबावर चढला, शेजाऱ्यानं 500 ची नोट दाखवल्यावर उतरला खाली

आईशी भांडण करून रागाच्या भरात हाय होल्टेज विजेच्या खांबावर चढला, शेजाऱ्यानं 500 ची नोट दाखवल्यावर उतरला खाली

जमलेल्या अनेक लोकांनी खाली उतरण्याची विनंती केली, मात्र कोणाचे काही ऐकत नव्हता. शेवटी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला पाचशे रुपयाची नोट दाखवल्यावर मग तो खाली उतरला.

जमलेल्या अनेक लोकांनी खाली उतरण्याची विनंती केली, मात्र कोणाचे काही ऐकत नव्हता. शेवटी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला पाचशे रुपयाची नोट दाखवल्यावर मग तो खाली उतरला.

जमलेल्या अनेक लोकांनी खाली उतरण्याची विनंती केली, मात्र कोणाचे काही ऐकत नव्हता. शेवटी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला पाचशे रुपयाची नोट दाखवल्यावर मग तो खाली उतरला.

  • Published by:  News18 Desk

कोटा, 20 जून: आईसोबत किरकोळ कारणावरून झालेल्या वादामुळे रागाच्या भरात एक तरुण हाय व्होल्टेज विद्युत (high voltage electricity line) प्रवाह असलेल्या खांबावर चडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, त्यावेळी विद्युत प्रवाह (young man climbed the high tension line tower) सुरू नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. जवळपास अर्धा तास हा खेळखंडोबा सुरू होता.

त्याला कुटुंबीयांसह खाली जमलेल्या अनेक लोकांनी खाली उतरण्याची विनंती केली, मात्र कोणाचे काही ऐकत नव्हता. शेवटी त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याला पाचशे रुपयाची नोट दाखवल्यावर मग तो खाली उतरला. मात्र, या घटनेची माहिती पोलिसांना ही मिळाल्यामुळे पोलिस घटनास्थळी उपस्थित झाले होते. पाचशे रुपयांना पाहून खाली उतरलेल्या या तरुणाला मग पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार राजस्थानच्या कोटा शहरातील आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे विद्युत खांबांवर चढण्याचा जणू काही ट्रेंडच सुरू झाला आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये अशाप्रकारे खांबावर चढल्याच्या 4 घटना समोर आल्या असून पोलिसांच्या डोक्याचा ताप नाहक वाढला आहे. अशाप्रकारे जीवाशी खेळ करणे खूप महागात पडू शकत.

रविवारी कौटुंबिक वादातून हा तरुण हाय व्होल्टेज लाईनच्या टॉवरवर चढला. गोबरिया बावडी परिसरात हा तरुण टॉवरच्या टोकावर जावून बसला होता. यामुळे आसपासच्या भागात घबराट पसरली. टॉवरखाली लोकांची मोठी गर्दी जमली होती. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर तो खाली आला, मात्र पोलिसांनी त्याला पकडून आपल्याबरोबर पोलीस ठाण्यामध्ये नेले.

हे वाचा - ‘या’ ठिकाणी आढळले 6 डायनासोरच्या पायांचे ठसे, वाचा 11 कोटी वर्षापूर्वींचा इतिहास

राजू तंवर असे या मुलाचे नाव आहे. तो गोबरिया स्टेपवेल जवळच्या वस्तीत राहतो. तो मजूर म्हणून काम करतो आणि त्याला दारूचे व्यसन असल्याचे सांगितले जात आहे. तरुणाचे त्याच्या आईशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळं रागाच्या भरात तो खांबावर चढला. चौकशीदरम्यान युवकाने सांगितले की, त्याला कोणाची ती 500 रुपयांची उधारी चुकती करायची होती. पण घरातील लोक पैसे देत नव्हते. मात्र, तो पोलिसांना उलट-सुलट उत्तरे देत असल्यानं नेमका कोणत्या कारणावरून तो वर चढला ते स्षट सांगता येत नव्हते.

500 रुपये दाखवले तर खाली उतरा

हाय टेंशन टॉवरमध्ये 33 केव्हीची लाईन होती. त्यात वीज नव्हती. वीज वळविण्यात आली. जेव्हा तो तरुण टॉवरवर चढला तेव्हा त्याने विजेच्या वायरला स्पर्श केला नाही. तो तरुण टॉवरच्या माथ्यावर बसला. पोलिसांनी गाडीमध्ये बसवलेल्या मायकवरून घोषणा करुन या युवकाला समजावण्याचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनीही त्यामध्ये सहकार्य केले. तो तरुण हळू हळू टॉवरवरुन खाली यायचा आणि मध्येच थांबायचा. शेवटी एकानं त्याला 500 रुपये देतो खाली उतर म्हटल्यानंतर तो खाली आला.

First published: