मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कर्जबाजारी तरुणाने मित्रांची मदत घेऊन फोडले ATM मशीन, 46 लाखांची रोकड लुटली, पण...

कर्जबाजारी तरुणाने मित्रांची मदत घेऊन फोडले ATM मशीन, 46 लाखांची रोकड लुटली, पण...


मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएममधून चोरट्यांनी 45 लाख 98 हजार 200 रुपयांची रक्कम चोरली होती.

मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएममधून चोरट्यांनी 45 लाख 98 हजार 200 रुपयांची रक्कम चोरली होती.

मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएममधून चोरट्यांनी 45 लाख 98 हजार 200 रुपयांची रक्कम चोरली होती.

मुरबाड, 30 मार्च : स्टेट बँकेच्या (State Bank of India) एटीएममधील तब्बल 46 लाखांची रक्कम चोरट्यानी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुरबाड येथे घडला होता. अखेर या चोरट्यांना मुरबाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. या एटीएममधून चोरट्यांनी 45 लाख 98 हजार 200 रुपयांची रक्कम चोरली होती. 24 मार्चला मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली होती. ही घटना 24 मार्चच्या सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आली. घटनेचे गांभीर्य ओळखत बँके मॅनेजरने या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील,आणि एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज, आणि तांत्रिक मदतीच्या साहाय्याने कल्याणामधून चौकडीला या प्रकरणी अटक केल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे  पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली आहे.

instagramdown : इन्स्टाग्राम पुन्हा डाउन, ट्विटरवर मिम्सचा पाऊस

सुरुवातीला या प्रकरणी काहीच धागेदोरे नसतांना पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले होते. अधिक तपास केला असता अन्य 2 जणांना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्याच्याकडून चोरलेल्या रक्कमेपैकी 40 लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे, पो. निरीक्षक सुरेश मनोरे, पो.निरीक्षक. दत्तात्रय बोराटे, यांनी विशेष तपास पथके तयार केली होती.

या पथकाने कोणतेही धागेदोरे हाती नसतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून 4 आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी  सांगितले. विशेष म्हणजे, या चार चोरट्या पैकी 1 चोरटा बँकेच्या एटीएममध्ये रक्कम भरण्याचे काम करीत असल्याने त्याला एटीएम मशीनमधून रक्कम काढणे आणि टाकणे अवगत होते. शिवाय तो कर्जबारी झाला होता. त्यामुळे त्याने तीन साथीदारांच्या मदतीने चोरीचा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

परमबीर सिंग आरोप प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या चौकशी समितीची अखेर घोषणा

या चोरट्यांकडून आतापर्यंत चोरीस गेलेली 39 लाख 69 हजार 700 रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे या आरोपींनी अन्य 2-3 एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस  तपासात समोर आले आहे. आता त्याचा शोध पोलिसांनी सुरू केल्याने अटक आरोपींचे नावे गुपित ठेवल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींपैकी काहींना 31 मार्च तर काहींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली आहे.

First published:

Tags: ATM, Crime, Thane